घरदेश-विदेशनासाच्या वितळलेल्या कॅमेरामागचं सत्य

नासाच्या वितळलेल्या कॅमेरामागचं सत्य

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून एका वितळलेल्या कॅमेराचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. अनेक कॅमेराप्रेमी हा फोटो पाहून ‘चुकचुकले’. कारण अशापद्धतीने इतका महागडा कॅमेरा वितळणं वितळणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलयं. पण हा कॅमेरा वितळला कसा ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हा कॅमेरा नासाचा असून एका यानाच्या उड्डाणावेळी या कॅमेऱ्याची अशी अवस्था झाल्याचे समजतेय.

असा वितळला कॅमेरा

- Advertisement -

नासाकडून अंतराळ मोहिमा सुरुच असतात. २२ मे रोजी जर्मन एफओ नावाचे यान अंतरिक्षात उड्डाणासाठी सज्ज होते. हे यान पृथ्लीतलावरील पाण्याचा अभ्यास करते. या उड्डाणाचे चित्रीकरण करण्यासाठी या परीसरात सहा कॅमेरे लावण्यात आले होते. यातील एका कॅमेऱ्याची ही अवस्था झाली आहे. उड्डाणावेळी निर्माण झालेल्या उष्णतेमुळे हा कॅमेरा वितळला असेल, असा अंदाज आधी व्यक्त केला जात होता. पण ज्यावेळी या कॅमेऱ्याने टिपलेले क्षण तपासण्यात आले त्यावेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा झाला. हा कॅमेरा ज्या ठिकाणी लावण्यात आला होता त्या ठिकाणी असलेले गवत जळाले आणि ती आग कॅमेराभोवती लागल्याने हा कॅमेरा वितळल्याचे कळत आहे. पण या कॅमेराने टिपलेला क्षण काही सेंकदासाठी तुम्हाला अचंबित करतो.

हे आहेत वितळलेल्या कॅमेऱ्याचे कॅमेरामन

गेली ३० वर्षे बिल इन्गल्स नासासाठी काम करत आहेत. नासाच्या प्रत्येक उड्डाणाची क्षणचित्रे त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात अशी काय टिपली आहेत की, ते फोटोज पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. २२ मे रोजी या उड्डाणावेळी त्यांनी कॅमेरा सेटअप केला होता. पण अचानक ही घटना घडली. काही का असेना त्यांनी कॅमेऱ्यात टिपलेला प्रत्येक क्षण इतका खास असतो की, या वितळलेल्या कॅमेऱ्यात क्षणांनी त्यांना सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं.

nasa camera
नासाच्या वितळलेल्या कॅमेराने टिपलेला क्षण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -