घर देश-विदेश विद्यार्थ्यांना पाहून राष्ट्रपतींचा ताफा रस्त्यावर थांबला; विद्यार्थ्यांशी हितगूज

विद्यार्थ्यांना पाहून राष्ट्रपतींचा ताफा रस्त्यावर थांबला; विद्यार्थ्यांशी हितगूज

Subscribe

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होत्या. दरम्यान आज त्यांच्या दौऱ्याच्या शेवटचा दिवस होता.

फोंडा (गोवा) : देशाच्या राष्ट्रपती म्हणजे सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती. या व्यक्तीभोवती सुरक्षेचा गराळा असतो. कुणीच असं सहज त्यांच्याजवळ सुद्धा जाऊ शकत नाही. मात्र, चक्क राष्ट्रपतींना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आनंद फोंड्यातील विद्यार्थ्यांना घेता आला आहे. यावेळी महामहीम राष्ट्रपतींनीसुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधला.(Seeing the students, the President’s motorcade stopped on the road; Interact with students)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होत्या. दरम्यान आज त्यांच्या दौऱ्याच्या शेवटचा दिवस होता. दरम्यान, आज गोव्यातील विविध कार्यक्रम आटोपून त्या निघत असताना फोंड्यात विद्यार्थ्यांना पाहून त्यांनी अचानक आपला ताफा थांबवला आणि त्या थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मिसळल्या त्यांच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्वीगुणीत झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा : “कृपया माझे अभिनंदन स्वीकारा”; रशियाच्या राष्ट्राध्यक्षकांनीही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पाठवला शुभेच्छा संदेश

फोंड्यातील जीव्हीएम महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राष्ट्रपती

गोवा दौरा आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी फोंड्यातील जीव्हीएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेट दिली. त्यांनी कॅम्पसमध्ये थेट येत विद्यार्थ्यांशी बोलल्या. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री विद्यार्थी-विद्यार्थीनींना त्यांच्याजवळ बोलावून घेतले. यावेळी काही जणांनी फोटोही काढून घेतले.

- Advertisement -

हेही वाचा : Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर अभिनेता प्रकाश राज झाले ट्रोल, वाचा…

अचानक उडाली होती धावपळ

भारताच्या राष्ट्रपतींचा ताफा थांबला असून त्या स्वतः विद्यार्थ्यांमध्ये मिसळत असल्याचे पाहून विद्यार्थीही भारावले. यावेळी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत मुर्मू यांनी आपल्याकडील कॅडबरीज विद्यार्थ्यांना वाटल्या. विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यानंतर प्रचंडी उत्साही झाले होते. मुर्मू यांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. त्यावेळी राष्ट्रपतींच्या सुरक्षारक्षकांचीही थोडी धावपळ उडाली. राष्ट्रपतींच्या या साधेपणाने विद्यार्थी प्रचंड भारावले. त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरू होती. या वेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासमवेत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

 

- Advertisment -