नवी दिल्ली : पब्जी गेमच्या माध्यमातून पाकिस्तानातून थेट भारतात आलेल्या सीमा आणि सचिनची प्रेमकहाणी सध्या आपल्या देशात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. दरम्यान सीमा ही कुठला ना कुठला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. असाच तिचा आता नवीन व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती राख्या पॅक करीत असून, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांना पाठवित आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.(Seema from Pakistan sent rakhi to ‘these’ leaders including Modi; Said – As a sister…)
पाकिस्तानातून ग्रेटर नोएडा येथे सचिनसोबत राहणारी पाकिस्तानी सीमा हैदरचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती पीएम नरेंद्र मोदींना राखी पाठवण्याच्या तयारीत दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत. लोकांनी कमेंट करून म्हटले की, बहिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी पाठवली आहे, तिला पंतप्रधान भावाकडून भेटवस्तू मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून तपास सुरू
सीमा हैदर भारतात आल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला होता. गुप्तचर यंत्रणांकडून तपास सुरू आहे. तिच्याविरुद्ध न्यायालयात खटलाही सुरू आहे.
हेही वाचा : नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? वाचा काय सांगतो अहवाल? राज्यातील ‘या’ नेत्याचंही नाव चर्चेत
पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली मागणी
या सगळ्या भानगडीमध्येही सीमा हैदर सतत भारताच्या नागरिकत्वाची मागणी करताना दिसत आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर नेत्यांना आवाहन केले आहे. याशिवाय त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही पत्र पाठवले आहे. आता ती राखी पाठवून भाऊ म्हणून माझे रक्षण करा अशी आशा व्यक्त करताना दिसत आहे.
हेही वाचा : भाजपने राहुल गांधीचे आरोप फेटाळले; काँग्रेसने चीनसोबत केलेल्या कराराची करून दिली आठवण
या नेत्यांना पाठवली राखी
सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोस्टाने राखी पाठवली आहे. यासोबत सीमाने सरसंघचालक मोहन भागवत यांनाही राखी पाठवली आहे. सीमा हैदरने या दिग्गज नेत्यांना राखी पाठवून आनंद व्यक्त केला आहे.