सीमा ओलांडून भारतात आलेली पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर रविवारी (13 ऑगस्ट) ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी झाली आणि तिने आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला. सध्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या सीमाने पती सचिनसोबत तिरंगा फडकावला. यादरम्यान सीमाचे वकील एपी सिंह देखील तेथे उपस्थित होते, त्यांनी सांगितले की सीमा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाही आणि तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी आलेली ऑफर देखील नाकारली आहे. ( Seema Haider a Pakistani participated in the Har Ghar Tiranga campaign on Sunday and hoisted the tricolor flag at her home )
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सीमा आणि सचिन यांनी तिरंगा फडकवताना ‘भारत माता की जय’ आणि ‘हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. सीमा हैदरला बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी सीमाला याबाबत इशाराही दिला आहे.
सीमा हैदरला तपास यंत्रणांकडून क्लीन चिट मिळाल्यास तिला खुल्या मनाने स्वीकारा, तिला आपले बनवा. भारतानं अनेकांना आश्रय दिला आहे, असे आवाहन सीमाच्या वकिलांनी गावकऱ्यांना केलं आहे.
नेपाळमार्गे सीमा भारतात आली
सीमा हैदर आपल्या चार मुलांसह भारतात आली आणि नोएडामध्ये राहणाऱ्या सचिन मीनाशी लग्न केले. 2019 मध्ये ते दोघे PubG या ऑनलाइन गेममुळे त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर मे 2023 मध्ये ती नेपाळमार्गे भारतात पोहोचली. 4 जुलै रोजी सचिनशी लग्न करण्यासाठी ती वकिलाकडे गेली असता, तिला अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिच्यासह सचिन आणि सचिनच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र, 2-3 दिवसांत सोडण्यात आले.
सीमा हैदरला कुठल्यातरी कटाखाली सीमेपलीकडून पाठवण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी 17 जुलैपासून तिची चौकशी सुरू केली. मात्र, चौकशीत पोलिसांना कोणताही हेरगिरीचा कोन आढळला नाही, त्यामुळे दोन दिवसांनी कारवाई थांबवण्यात आली.
( हेही वाचा: Seema Haider : सीमा हैदरच्या चित्रपटावरून निर्माता अमित जानी आणि मनसे आमने-सामने )