घर देश-विदेश Seema Haider : सीमा हैदरच्या चित्रपटावरून निर्माता अमित जानी आणि मनसे आमने-सामने

Seema Haider : सीमा हैदरच्या चित्रपटावरून निर्माता अमित जानी आणि मनसे आमने-सामने

Subscribe

मुंबई : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट बनवण्यावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते अमित जानी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आले आहेत. हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर धडक कारवाईसाठी तयार रहा, असा इशारा मनसेने दिला आहे. तर, हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा, असे प्रतिआव्हान अमित जानी यांनी दिले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि भारतातील सचिनची लव्हस्टोरी प्रचंड व्हायरल झाली. काही दिवसांपूर्वी सीमाला बॉलिवूडमधील एका चित्रपटामध्ये झळकण्याची संधी देखील मिळाली. सीमा आणि सचिन यांची आर्थिक परिस्थिती समोर आल्यानंतर बॉलिवूड निर्माते अमित जानी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आणि त्यांनी सीमाला बॉलिवूडमध्ये चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. जानी फायरफॉक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित जानी यांनी सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर ‘कराची टू नोएडा’ या नावाने चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी सीमाला एका चित्रपटाची ऑफरही दिली आहे. मात्र अमित जानी यांना सातत्याने धमक्या आणि इशारे मिळत आहेत.

हेही वाचा – ‘कार्यकर्ते लढणार आणि तुम्ही नाती सांभाळणार’; राऊतांनी पवारांना थेट सुनावलं

- Advertisement -

पण त्यावरूनच आता वादगंग निर्माण झाला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत अमित जानी यांना हा प्रोजेक्ट बंद करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतेही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती आयएसआय एजंट आहे, अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवत आहेत. देशद्रोही निर्मात्यांना लाज कशी वाटत नाही? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देत आहोत. ऐकले नाही तर राडा तर होणारच, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे, अमित जानी यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी 19 ऑगस्टला मुंबईला जाणार आहे. मनसेमध्ये हिम्मत असेल तर माझ्यावर हल्ला करून दाखवा, असे प्रतिआव्हानच त्यांनी दिले आहे.

- Advertisment -