घर ताज्या घडामोडी सचिन आणि चार मुलांना सोडून सीमा हैदर पाकिस्तानच्या वाटेवर, काय आहे सत्यता?

सचिन आणि चार मुलांना सोडून सीमा हैदर पाकिस्तानच्या वाटेवर, काय आहे सत्यता?

Subscribe

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे मुंबई टू कराची तिकीट बूक करण्यात आले आहे. यामुळे सीमा हैदर आता तिचा प्रियकर सचिन आणि चार मुलांना भारतात सोडून पाकिस्तानात परत जाणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा सुरु होण्याचे कारण राजकीय आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी सीमा हैदरवर चित्रित होणाऱ्या सिनेमाला विरोध केला आहे. सोम यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अमित जानी यांना चित्रपट काढल्यास सेटवर येऊन तोडफोट करण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर अभिषेक सोम यांनी सीमा हैदर आणि अमित जानी यांना पाकिस्तानात पाठवण्याचीही तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी सीमा हैदर आणि अमित जानी यांचे 31 डिसेंबर 2023 चे मुंबई ते कराची विमानाचे तिकीट देखील काढले आहे. तिच्या चार मुलांचे मात्र तिकीट काढण्यात आले नाही.

सीमा हैदर आता पाकिस्तानात जाणार

- Advertisement -

सीमा हैदर आता पाकिस्तानात जाणार की नाही, याबद्दल संशय निर्माण झाला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश एटीएसनेही सीमा आणि सचिनची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्यासोबतच इतरही अनेक लोक हे सीमा आणि सचिनच्या प्रेम कहाणीमध्ये येऊन लाईमलाईट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांनी सीमा आणि सचिनच्या लव्हस्टोरीवर ‘कराची टू नोएडा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. यासाठी नोएडामध्ये सीमा आणि सचिनच्या रोलसाठी ऑडिशनही घेण्यात आली. सीमाला देखील या चित्रपटातून अभिनयाची संधी दिली जाणार आहे. एक प्रकारे तिचे चित्रपट सृष्टीत लाँचिंग होणार आहे. सीमाची स्क्रिन टेस्ट देखील झाली आहे.

सीमा हैदरच्या चित्रपट पदार्पणाला विरोध 

- Advertisement -

चित्रपटात सीमा हैदरला काम दिले जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे माजी प्रवक्ते अभिषेक सोम यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. दिग्दर्शक अमित जानी यांनाही धमक्या देण्यात आल्या. त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना ट्विट करत सोम यांची तक्रार केली आहे. दुसरीकडे अभिषेक सोम यांनीही अमित जानी विरोधात नोएडा पोलिस आयुक्तांकडे सामाजिक शांतता बिघडवण्याचा आरोप केला आहे.

अमित जानीने म्हटले आहे, की सीमाला चित्रपटात काम देणार असल्याच्या माझ्या घोषणेनंतर सपा नेता अभिषेक सोम यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करुन मला धमकी दिली. चित्रपटाच्या सेटवर येऊन तोडफोड करण्याचे त्या व्हिडिओत म्हटले आहे. पद्मावतच्या शुटिंग ज्या प्रमाणे उधळून लावण्यात आली होती, तसेच आताही केले जाईल, अशी धमकी सोम यांनी दिली आहे.

31 डिसेंबरचे तिकीट बूक

अमित जानी आणि अभिषेक सोम यांच्यात सोशल मीडियावर तु-तू-मै-मैं सुरु आहे. त्यातच अभिषेक सोम यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात फिल्मचे पोस्टर आणि मुंबई ते कराचीचे दोन तिकीट आहे. एक तिकीट सीमा हैदरचे तर दुसरे दिग्दर्शक अमित जानी यांचे आहे. गल्फ एअरच्या फ्लाइटचे 31 डिसेंबर 2023चे हे तिकीट आहे. अभिषेक सोम यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, की गद्दारांना भारतात राहाण्याचा अधिकार नाही. आपल्या हिरोईनला घेऊन पाकिस्तानात चाले व्हा! सोम यांनी पुढे लिहिले आहे, की आमित जानीला देशात दंगली घडवायच्या आहेत. आमित जानी आणि सोम यांच्यातील सोशल मीडियावरील वाक्-युद्धामुळे सीमा हैदर आता पाकिस्तानात परत जाणार का? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisment -