घरदेश-विदेशSeema Haider : पाकिस्तानात दरोडेखोरांकडून हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला; सीमा हैदरशी आहे...

Seema Haider : पाकिस्तानात दरोडेखोरांकडून हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला; सीमा हैदरशी आहे कनेक्शन?

Subscribe

Seema Haider : सीमा रिंद उर्फ ​​सीमा हैदर (Seema Haider) ही पाकिस्तानी महिला PUBG गेम खेळताना भारतातील (India) एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि ती पाकिस्तानातून (Pakistan) पळून दिल्लीतील (Delhi) ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे राहत आहे. याप्रकरणी सीमा हैदर हिला पाकिस्तानात परत न पाठवल्यास हिंदू मंदिरावर (Hindu Temple) हल्ला करण्याची दरोडेखोरांनी धमकी दिली होती. अशातच रविवारी (16 जुलै) पाकिस्तानच्या सिंध प्रातांत दरोडेखोरांनी मंदिरावर रॉकेट लाँचरने (Rocket Launcher) हल्ला केला आहे. तेथील पोलीस (Polive) अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Seema Haider Rocket attack on Hindu temple by robbers in Pakistan Is there a connection with Seema Haider)

पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडाचा सचिन या दोघांनी प्रेमकहाणी सध्या भारतापासून पाकिस्तानपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीमा हैदर भारताच्या सचिन मीनाच्या प्रेमात आहे आणि ती तिच्या चार मुलांसह ग्रेटर नोएडामध्ये त्याच्यासोबत राहत आहे. ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सर्व 11 जागा बिनविरोध, TMCचे 6 आणि भाजपचे 5 उमेदवार

सीमा हैदर ही पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी आहे. ती आपल्या चार मुलांसह भारतात आल्यानंतर डाकू राणो शारने याने महिलेला पाकिस्तानात न पाठवल्यास मंदिरांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. यानंतर रविवारी पाकिस्तानमध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, रविवारी दरोडेखोरांच्या टोळीने सिंधमधील कश्मोर येथील एका हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. तसेच त्यांनी गौसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रार्थनास्थळाच्या आसपासच्या हिंदू समाजाच्या घरांवरही अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर काश्मीर-कंधकोटचे एसएसपी इरफान सामो यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

- Advertisement -

मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला

सिंध पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोरांनी मंदिरावर ‘रॉकेट लाँचर’ने हल्ला केला. यावेळी मंदिर बंद होते, पण ते दरवर्षी बागडी समुदायाद्वारे आयोजित धार्मिक सेवांसाठी उघडले जाते. या हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेले आहेत. त्यांना पकडण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. दरम्यान बागडी समाजाचे सदस्य डॉ. सुरेश यांनी सांगितले की, दरोडेखोरांनी रॉकेट लाँचरने केलेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झाली नाही. त्यांनी पोलिसांनी समाजाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. कारण या हल्ल्यानंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा – आप-काँग्रेसच्या एकजुटीनंतर विरोधकांची बैठक, लोकसभेसाठी रणनीती ठरण्याची शक्यता

दरोडेखोरांनी मंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिली होती

सीमा हैदर ही महिला नेपाळमार्गे भारतात आल्यानंतर पाकिस्तानी दरोडेखोरांनी एक व्हिडिओ जारी करताना धमकी दिली होती की, आम्ही आवाहन करतो की, आमची मुलगी पाकिस्तानातून भारतात दिल्लीला पळून गेली आहे. जर आमच्या मुलीला परत पाठवले नाही तर याठिकाणी असलेल्या हिंदू मंदिरावर हल्ले करू. जर प्रतिष्ठा प्रिय असेल तर परत पाठवा. आम्ही बलोच समाजाचे आहोत. दरोडेखोर राणो शारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो अपशब्द वापरताना दिसत आहे.

PUBG खेळताना सीमा हैदर प्रेमात पडली

काही दिवसांपूर्वी सीमा हैदर आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून पळून भारतात आली होती. PUBG गेम खेळताना सचिनच्या प्रेमात पडल्याचे तो सांगतो. सचिन ग्रेटर नोएडामधील एका गावात राहतो. सीमाला पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक सचिनच्या घरी येत आहेत. सचिनसोबत आयुष्य घालवण्यासाठी सीमाने हिंदू धर्म स्वीकारला असून तिला भारत आणि हिंदू धर्मावर खूप प्रेम असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा – सुपरफास्ट नव्हे तर बर्निंग ट्रेन, वंदे भारत ट्रेनच्या डब्याला आग

पाकिस्तानींनी सीमा हैदरला केले टार्गेट

दरम्यान, सीमा हैदरने असे पाऊल उचलल्यामुळे पाकिस्तानातील लोक संतापले आहेत. गंगा नदीत स्नान करून हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचे सीमाने म्हटल्यावर पाकिस्तानींकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जे पाकिस्तानचे झाले नाही ते भारताचे काय होणार. त्याचवेळी काही पाकिस्तानींनी सीमा हैदरने शुद्ध हिंदी बोलल्याबद्दल टार्गेट केले आणि ती पाकिस्तानी कशी असू शकते? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -