घरदेश-विदेशगोऱ्यांना भारताची प्रगती बघवत नाही... हिंडनबर्ग अहवालावर सेहवागची संतप्त प्रतिक्रिया 

गोऱ्यांना भारताची प्रगती बघवत नाही… हिंडनबर्ग अहवालावर सेहवागची संतप्त प्रतिक्रिया 

Subscribe

अमेरिकेची खासगी संशोधन संस्था असलेल्या हिंडनबर्गच्या अहवालाने देशातील वातावरण आधीच तापले आहे. यामुळे विरोधकांनी गौतम अदानीसह केंद्र सरकारला देखील निशाण्यावर घेतले आहे. या अहवालावर क्रिकेट जगतातून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने याबाबत एक ट्विट केले आहे. 

हिंडनबर्ग अहवालामुळे उद्योजक गौतम अदानी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या अहवालानंतर टॉप-2 मध्ये असलेले गौतम अदानी हे थेट 20 जणांच्या श्रीमंत यादीतून देखील बाहेर पडले आहे. याशिवाय अदानी यांना कोणत्या बँकेने किती कर्ज दिले आहे? याबाबतची माहिती देखील आरबीआयकडून मागवण्यात आली आहे. ज्यानंतर अदानींच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. 10 ते 12 दिवसांमध्ये अदानींच्या शेअर्समध्ये 44 टक्क्यांनी घट झाली आहे. याचे पडसाद संसदेतही पाहायला मिळाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला सुद्धा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणावर अनेकांनी आपली मत व्यक्त केली आहेत. गौतम अदानी यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. असे असतानाच भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने याबाबत ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटला नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींकडून सेहवागला ट्रोल देखील केले गेले आहे.

- Advertisement -

वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, गोऱ्यांना भारतीयांची प्रगती सहन होत नाही. आता सध्या शेअर मार्केटमध्ये जी काही पडझड होत आहे, हे सर्व हुशारीने नियोजन करत केलेलं षडयंत्र असल्याचे सेहवागने आरोप केला आहे. तसेच तुम्ही कितीही प्रयत्न करा, भारत पुन्हा मजबूत होईल, असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. दरम्यान, सेहवागकडून त्याच्या या ट्विटमध्ये कोणाचेही प्रत्यक्षपणे नाव घेण्यात आलेले नाही. क्रिकेटच्या मैदानावर जोरदार फटकेबाजी करणाऱ्या सेहवागने हे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

हिंडेनबर्गच्या या अहवालामुळे अदानी समूहावर मोठे संकट कोसळले आहे. या अहवालामुळे आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर अदानी यांनी खरंच घोटाळा केला आहे का? असा प्रश्न देखील भारताच्या जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या अहवालामुळे केंद्र सरकारला सुद्धा कोंडीत पकडण्यात आले. त्यानंतर अदानी समूहाशी केंद्राचा काहीही संबंध नसल्याचे केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -