घरदेश-विदेशICCWकडून राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी 56 मुलांची निवड, तीन वर्षांचे एकत्रित वितरण

ICCWकडून राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी 56 मुलांची निवड, तीन वर्षांचे एकत्रित वितरण

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या 65 वर्षांपासून भारतीय बालकल्याण परिषदेद्वारे (ICCW) दरवर्षी बहादूर मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. यावेळी एकाच वेळी तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यासाठी 56 मुलांची निवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे या पुरस्काराचे वितरण होऊ शकले नाही.

भारतीय बालकल्याण परिषदेच्या आजीवन मार्गदर्शक आणि माजी अध्यक्ष गीता सिद्धार्थ यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. 2020साठी 22, 2021साठी 16 आणि 2022साठी 18 मुलांची निवड करण्यात आली आहे. दोन मुलांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येत आहे. सर्व मुले वेगवेगळ्या 17 राज्यांतील आहेत. या सर्व मुलांना पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे. मात्र, या मुलांना हे पुरस्कार कधी आणि कोणाकडून दिले जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – एकापाठोपाठ एक घटना सुरूच : राजकीय नेत्यांच्या अपघातांचं सत्र थांबणार कधी?

भारत पुरस्कार अंतर्गत भारतीय बालकल्याण परिषदेकडून एक लाख रुपये दिले जातात. मार्कंडेय, प्रल्हाद, एकलव्य, अभिमन्यू, श्रावण, ध्रुव पुरस्कारांतर्गत 75 हजार रुपये तर उर्वरित सर्वसाधारण गटात 40 हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहितीही गीता सिद्धार्थ यांनी दिली

- Advertisement -

दोन मुलांनी दाखवलेल्या बहादुरीबद्दल भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1957मध्ये त्यांचा गौरव केला होता. तेव्हापासून, भारतीय बालकल्याण परिषदेकडून दरवर्षी बहादूर मुलांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. 2018पर्यंत भारतीय बालकल्याण परिषदेने निवडलेल्या मुलांना पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार मिळत असे. तसेच, त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी देखील दिली जात होती. परंतु 2019मध्ये, भारतीय बालकल्याण परिषदेवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाल्यानंतर, केंद्र सरकारने या पुरस्कारांपासून दूर राहणेच पसंत केले. आता केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय स्वतंत्रपणे पुरस्कार देते. सरकारी पातळीवर वेगळे झाल्यानंतर परिषदेने आपल्या पुरस्कारांची नावे बदलून बापू गायधनी, संजय चोप्रा, गीता चोप्रा यांच्याऐवजी मार्कंडेय, ध्रुव आणि प्रल्हाद अशी नावे ठेवली आहेत.

हेही वाचा – शिवसेना पक्षचिन्हासह पक्षप्रमुखपदही अधांतरी, निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारीला सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -