Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Sengol Controversy : वाद थांबेना; कपिल सिब्बल म्हणाले, 'भारतात सत्तेचं हस्तांतरण...'

Sengol Controversy : वाद थांबेना; कपिल सिब्बल म्हणाले, ‘भारतात सत्तेचं हस्तांतरण…’

Subscribe

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी लोकसभेतील त्यांच्या पहिल्या भाषणात सेंगोलचे महत्त्व सांगितले. पण पंतप्रधानांनी सेंगोलचा सांगितलेला अर्थ मान्य नसल्याचे वक्तव्य माजी राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केलेले आहे. सिब्बल यांनी याबाबतचे ट्वीट देखील केले आहे.

देशाच्या नवीन संसद भवनाचे रविवारी (ता. 28 मे) भव्यदिव्य सोहळ्यासह उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत पूजा करत सेंगोलची (राजदंड) लोकसभेत स्थापना केली. पण गेल्या 75 वर्षांपासून कधीच कोणाच्या चर्चेचा विषय नसलेल्या सेंगोलवरून मात्र राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी लोकसभेतील त्यांच्या पहिल्या भाषणात सेंगोलचे महत्त्व सांगितले. पण पंतप्रधानांनी सेंगोलचा सांगितलेला अर्थ मान्य नसल्याचे वक्तव्य माजी राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केलेले आहे. सिब्बल यांनी याबाबतचे ट्वीट देखील केले आहे.

हेही वाचा – नवीन संसद भवन उद्घाटन महासोहळा : PM मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले सेंगोलचे महत्त्व 

- Advertisement -

कपिल सिब्बल हे कायमचं त्यांचे मत निर्भिडपणे सर्वांसमोर मांडत असतात. रविवारी संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर कपिल सिब्बल यांनी इंग्रजीमध्ये ट्वीट केले. त्यांनी इंग्रजीमध्ये केलेल्या ट्वीटनुसार, ““भारतीय जनता पक्षाचे नेते सेंगोलला ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचा समानार्थी शब्द मानतात. मात्र, तसं नाही. शक्य झाल्यास माझं म्हणणं ऐका. भारतात सत्तेचं हस्तांतरण त्या लोकांच्या इच्छेनं झालं ज्यांनी स्वतः हे संविधान दिलं. देवी मीनाक्षी यांनी मदुराईच्या राजाला भेट दिलेलं सेंगोल हे राज्य करणाऱ्या दैवी अधिकाराचं प्रतीक होतं.” अशी माहिती सिब्बल यांनी त्यांच्या ट्वीटमधून दिली आहे.

काल रविवारी (ता. 28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील लोकशाहीचे मंदिर म्हंटल्या जाणाऱ्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम दोन टप्प्यात पार पडला. पहिल्या टप्प्यामध्ये पुजा आणि सर्वधर्मियांची प्रार्थना झाली. त्यावेळी मोदींच्या हस्ते लोकसभेमध्ये पवित्र अशा सेंगोलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या नव्या संसद भवनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देसाला नवीन संसद मिळाली, असे मत यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केले. तर या संसद भवनाच्या कामामुळे 60 हजार कामगारांना रोजगार मिळाल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या पहिल्या भाषणात सेंगोलचे महत्त्व सांगितले. त्यावेळी ते म्हणाले की, “आज या ऐतिहासिक प्रसंगी, काही काळापूर्वी संसदेच्या या नवीन इमारतीत पवित्र सेंगोलची स्थापनाही करण्यात आली होती. ग्रेट चोल साम्राज्यात, सेंगोल हे कर्तव्याचा मार्ग, सेवेचा मार्ग, राष्ट्राच्या मार्गाचे प्रतीक मानले जात असे. राजाजी आणि अधिनाम मठाच्या संतांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनले. तामिळनाडूहून खास आलेले अधिनाम मठाचे संत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी संसद भवनात हजर झाले. मी पुन्हा एकदा त्यांना नमन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेत या पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वीही यासंदर्भातील अनेक माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. आम्ही या पवित्र सेंगोलची प्रतिष्ठा, मान-सन्मान परत करू शकलो हे मी आमचे भाग्य समजतो.”

- Advertisment -