ऐतिहासिक निर्णय! सौरभ कृपाल बनले भारतातील पहिले ‘समलैंगिक न्यायाधीश’

senior advocate saurabh kirpal first gay judge in delhi high court all thing need to know
ऐतिहासिक निर्णय! सौरभ कृपाल बनले भारतातील पहिले 'समलैंगिक न्यायाधीश'

केवळ भारतीय न्यायव्यवस्थेसाठी नाही तर देशासाठी एक ऐतिहासिक आणि गौरवशाली निर्णय समोर आला आहे. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश म्हणून भारतात पहिल्यांदाच ज्येष्ठ समलैंगिक वकील सौरभ कृपाल यांची निवड करण्यात आली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांच एक ज्येष्ठ समलैंगिक वकील हे न्यायाधीश पदासाठी निवडणून आल्याने ही गौरवाची बाब मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ११ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्त करण्याची शिफारस केली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयाने संमती देत कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायामूर्ती पदी नियुक्ती केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे आता सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. कारण उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायव्यवस्थेमध्ये उघडपणे समलैंगिक सदस्याला न्यायाधीश करण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सौरभ कृपाल हे देशाचे पहिले समलैंगिक न्यायमूर्ती झाले आहेत.

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून न्यायमूर्ती सौरभ कृपाल यांचे अभिनंदन केले आहे. वकील इंदिरा जयसिंग यांनी लिहिले की, जे देशातील उच्च न्यायालयाचे पहिले समलिंगी न्यायाधीश होण्यासाठी सज्ज झाले आहेत. शेवटी आम्ही लैंगिक अभिमुखतेवर आधारित भेदभाव संपवणारी सर्वसमावेशक न्यायव्यवस्था बनणार आहोत,”

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक स्टेटमेंट जारी केले होते. यात त्यांनी म्हटलंय की, मार्च २०२१ मध्ये भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश एसए बोबडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायधीश म्हणून सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस केली होती. तसेच केंद्र सरकारला यावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. दरम्यान ऑक्टोबर २०१७ मध्ये दिल्ली एचसी कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु काही मतभेदामुळे कृपाल यांच्या पदोन्नतीचा अंतिम निर्णय चार वेळा पुढे ढकलण्यात आला. अखेर २०२१ मध्ये त्यांना न्यायमूर्ती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

कोण आहेत सौरभ कृपाल?

सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. जिनिव्हामधील संयुक्त राष्ट्र संघासोबत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सराव सुरु केला. सौरभ कृपाल यांनी जे महत्वाचे खटले लढले त्यात नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारतीय संघ या खटल्याचा समावेश आहे. सौरभ कृपाल हे नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारतीय संघ या खटल्यात याचिकाकर्त्यांचे वकील होते. ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सप्टेंबर २०१८ मध्ये कलम ३७७ रद्द केले.