खुशखबर! ज्येष्ठ नागरिकांना सरकार रेल्वेभाड्यात सूट देण्याच्या विचारात

रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या काळात रद्द करण्यात आलेल्या सुविधा रेल्वे प्रशासन पुन्हा लागू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. संसदेच्या स्थायी समितीने रेल्वेच्या एसी-३ आणि स्लीपर कोचच्या भाड्यात जेष्ठ नागरिकांना सूट देण्याच्या विचारात आहे.

indian railway news link facility will be closed many train will catch speed passenger will get benifited

रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या काळात रद्द करण्यात आलेल्या सुविधा रेल्वे प्रशासन पुन्हा लागू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. संसदेच्या स्थायी समितीने रेल्वेच्या एसी-३ आणि स्लीपर कोचच्या भाड्यात जेष्ठ नागरिकांना सूट देण्याच्या विचारात आहे. त्याबाबतचा प्रस्थाव देण्यात आला असल्याचे समजते. रेल्वे संबंधी असलेले संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राधा मोहन सिंह यांनी संसदेत सादर केलेल्या अहवालात या बाबतच उल्लेख केला आहे. (senior citizens government is preparing to give relaxation in rail fares again)

“दीड वर्षांपूर्वी कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी रेल्वे भाड्यातील सूट ही बंद करण्यात आली होती. ही सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात सरकार आहे”, असल्याचे समितीने म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात कोरोना नियमावली लक्षात घेऊन रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी रेल्वेतील विविध श्रेणीतील सूट ही रद्द केली होती. यामध्ये 58 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना 50 टक्के आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांना 40 टक्के सूट ही रेल्वे भाड्यात दिली जात होती.

सध्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध विभागातील सुविधा या पुन्हा लागू करण्याच्या विचारात सरकार आहे. त्यानुसार, स्लीपर क्लास, एसी-3 मध्ये ही सुविधा बहाल केली जाऊ शकते. कोरोना काळापूर्वी जवळपास 4 कोच मध्ये य प्रकारची सुविधा ही ज्येष्ठ नगिरकांना मिळत होती.

याशिवाय, दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या 4 विभागातील सुविधांसोबत, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 11 विभागात पुन्हा सवलत देण्यास सुरुवात करण्यात आल्याचे समजते.


हेही वाचा – देशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद, तर रुग्णांमध्ये 25.8 टक्क्यांनी वाढ