घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनामुळे गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बद्रुद्दिन शेख यांचे निधन

CoronaVirus: कोरोनामुळे गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बद्रुद्दिन शेख यांचे निधन

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ बद्रुद्दिन शेख यांच्या निधनाची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते शक्ती सिंह गोहिल यांनी दिली.

देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान गुजरातमधील काँग्रसेला कोरोनामुळे मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बद्रुद्दिन शेख यांचे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. एसव्हीपी रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस पक्षाचे नेते शक्ती सिंह गोहिल यांनी याबाबत माहिती दिली. गोहिल यांनी ट्विट करून लिहिलं की, मी बद्रुद्दिन शेख यांना ४० वर्षांपासून ओळखत आहे. त्यावेळेस ते युवा काँग्रेसमध्ये होते. आजकाल ते गरिबांचे कल्याण करण्यासाठीच्या कामात मदत करत होते. शेख अहमदाबादच्या दाणी लिमडा भागातील नगरसेवक होते. या भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. अहमदाबादचा हा भाग हॉसस्पॉट क्षेत्र आहे.

- Advertisement -

१५ एप्रिलला काँग्रेसचे नेते बद्रुद्दिन शेख यांचा अहवाला पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तसंच ते काही दिवस होम क्वारंटाईन असल्याचं देखील सांगितलं जात आहे. जेव्हा आमदार इम्रान खेडावाला मुख्यमंत्री विजय रुपानी यांना मंगळवारी भेटायला गेले होते तेव्हा बदरुद्दान शेख देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होत. महत्त्वाचे म्हणजे गुजरातच्या अहमदाबादमध्ये जमालपूर-खादी काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारकरिता त्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. इम्ररान खेडावाला यांनी राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि गृहमंत्री प्रदीप सिंग जडेजा यांचीही बैठक झाली होती. त्यावेळेस सोशल डिस्टन्सिंग ठेऊन ही बैठक घेण्यात आली होती.

रविवारी गुजरातमध्ये २३० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. त्यामुळे गुजरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३०१वर पोहोचली. तसंच राज्यात १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू असून मृतांचा आकडा १५२वर पोहोचला आहे. २३० नव्या कोरोना रुग्णांमध्ये १७९ रुग्ण हे अहमदाबाद मिळाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: कोरोनामुक्त झाल्यानंतर कनिका यांच्यासोबत करतेय टाईम स्पेंड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -