घरदेश-विदेशसेन्सेक्स 1,700 अंकांनी कोसळला, निफ्टी 16,850 पर्यंत खाली, बाजारात घसरण का होतेय?

सेन्सेक्स 1,700 अंकांनी कोसळला, निफ्टी 16,850 पर्यंत खाली, बाजारात घसरण का होतेय?

Subscribe

नवी दिल्ली: मुंबई शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्ससह इक्विटी इंडेक्स सोमवारी जवळपास 1,750 अंकांची घसरण दिसून आली. दिवसाच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स 56,296 च्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर 30 शेअर्सचा बीएसई निर्देशांक 1,747 अंक म्हणजेच 3 टक्क्यांनी घसरून 56,406 वर बंद झाला, तर एनएसईचा निफ्टी निर्देशांक 532 अंकांनी म्हणजेच 3.06 टक्क्यांनी घसरून 16,843 वर स्थिरावला. 26 फेब्रुवारी 2021 नंतर सेन्सेक्समध्ये झालेली ही सर्वात मोठी एकदिवसीय घसरण होती.

टाटा स्टील, एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक हे 5.49 टक्क्यांपर्यंत घसरलेल्या सेन्सेक्सच्या तुलनेत सर्वाधिक पिछाडीवर होते. टीसीएस हा एकमेव स्टॉक होता, जो हिरव्या रंगात व्यापार करत होता. सेन्सेक्समध्ये 2,520.19 अंकांची घसरण झाल्याने 2 दिवसांत गुंतवणूकदारांचे 12.38 लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले. BSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल 2,55,42,725.42 कोटी रुपये इतके होते.

- Advertisement -

आजच्या बाजारातील घसरणीची ही प्रमुख कारणे

युक्रेनवरून रशिया आणि पश्चिमी देशांत वाढलेला तणाव

बाजारात झालेल्या या घसरणीमागे मुख्यत्वे युक्रेनवरून रशिया आणि पश्चिमेकडील देशांमध्ये वाढलेला तणाव हे कारण सांगितले जातेय. SMC सिक्युरिटीजचे सहाय्यक उपाध्यक्ष सौरभ जैन म्हणाले, “देशांतर्गत बाजारातील सुधारणा हा जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. उच्च चलनवाढीचे वातावरण, रशिया आणि युक्रेनमधील तणाव यामुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत आहेत. त्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण आहे. शेअर बाजार जागतिक स्तरावर घसरण्याबरोबरच युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याची भीती वाढली आहे.

- Advertisement -

फ्रँकफर्ट आणि पॅरिसमध्ये शेअर बाजार 3 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सुरू झाला. लंडन 2 टक्के आणि टोकियो 2.2 टक्क्यांच्या घसरणीसह शेअर बाजार सुरू झाला. शांघाय आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारातही पडझड पाहायला मिळाली.

व्हाईट हाऊसने अमेरिकन लोकांना 48 तासांत युक्रेन सोडण्यास सांगितल्यानंतर वॉल स्ट्रीटचा बेंचमार्क S&P 500 इंडेक्समध्ये शुक्रवारी 1.9 टक्क्यांनी घसरण झाली.

कच्च्या तेलाची किंमत

रशिया हा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. तेलाचा पुरवठा खंडित करणारी कोणतीही लष्करी कारवाई ऊर्जा बाजार आणि जागतिक उद्योगांमध्ये धक्कादायक परिस्थिती निर्माण करू शकते. अमेरिकन सरकारने युक्रेनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सावध केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या. ज्यामुळे ऑक्टोबर 2014 नंतर तेलाच्या किमती $96.16 या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्या.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती ही भारतासाठी आणखी एक मोठी चिंता आहे, जर ती विस्तारित कालावधीसाठी 95 बॅरल डॉलर पातळीवर राहिली तर अनुकूल आर्थिक स्थिती पाहायला मिळणार नाही.

 बँक स्टॉक्स दबावाखाली

बँक स्टॉक सीबीआयद्वारे एबीजी शिपयार्ड कंपनीने 28 बँकांची फसवणूक केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींवर त्याचा परिणाम दिसून आला. PSU बँक इंडेक्स जवळपास 6 टक्क्यांनी घसरला, तर खासगी बँक इंडेक्स 4 टक्क्यांहून अधिकने घसरला आहे.

7 फेब्रुवारी रोजी सीबीआयने ABG शिपयार्ड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांवर 22,842 कोटी रुपयांपेक्षा जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सीबीआयच्या तक्रारीत समाविष्ट असलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमधील आकडेवारीनुसार, कंपनीकडे आयसीआयसीआय बँकेचे 7,089 कोटी रुपये, आयडीबीआय बँकेचे 3,634 कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे 2,925 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाचे 1,614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेला 1,244 कोटी रुपये आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला 1,228 कोटी रुपयांची फसवणूक केली. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ज्या एबीजी शिपयार्डची खाती ठेवली जात होती, तिथेच हा भ्रष्टाचार झालाय.

सततच्या महागाईची भीती

चार दशकांच्या उच्चांकावर असलेल्या महागाईला आळा घालण्यासाठी युरोप आणि इतर मध्यवर्ती बँका किती लवकर प्रयत्न करतील, याकडे गुंतवणूकदार यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर कपात करण्याकडे सतत लक्ष देत आहेत. भारतातील घाऊक किमतीची चलनवाढ जानेवारीमध्ये सलग 10 व्या महिन्यात दुहेरी अंकात राहिली, कारण कंपन्या वाढत्या इनपुट खर्चाचा सामना करत आहेत आणि ग्राहकांवर त्याचा बोझा टाकत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरने असा इशाराही दिला की, जानेवारीसाठी किरकोळ चलनवाढ 6 टक्क्यांच्या सर्वोच्च श्रेणीजवळ राहण्याची अपेक्षा आहे.


शालेय युनिफॉर्मशी जुळणाऱ्या रंगाच्या हिजाबला परवानगी द्या, विद्यार्थिनींची कर्नाटक उच्च न्यायालयाला विनंती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -