Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Share Market : शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्समध्ये 1.31 टक्क्यांची वाढ

Share Market : शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्समध्ये 1.31 टक्क्यांची वाढ

Subscribe

शेअर बाजाराने आठवड्याच्या सुरूवातीलाच उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 786 अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 225 अंकांनी वधारला. तसेच सेन्सेक्समध्ये आज 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शेअर बाजारात आज एकूण 1788 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर 1657 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टी बँकमध्येही 317 अंकांची वाढ होऊन तो 41,307 अंकांवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287.11 अंकांच्या तेजीसह 60,246.96 अंकांवर खुला झाला.

- Advertisement -

कोणत्या कंपन्यांचे शेअर्स वाढले

UltraTech Cement, Eicher Motors, M&M, HDFC आणि Sun Pharma यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर Apollo Hospital, IndusInd Bank आणि Britannia यांसारखे कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा : बलात्काऱ्याला म्हटले ‘दयाळू’, टीका होताच कोर्टाने आदेशात केली सुधारणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -