Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE coronavirus : भारताला तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यासाठी युनिसेफचा पुढाकार

coronavirus : भारताला तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यासाठी युनिसेफचा पुढाकार

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. यात अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा बळी जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्र मदतीसाठी पुढे सरसावले आहे. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटना भारताला विविध आरोग्य़ासंबंधीत सेवा- सुविधा देणार असून यात तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचाही समावेश आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रांचा प्रमुखांचे उपप्रवक्ता फरहान हक यांनी माहिती दिली.

दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेरस यांनी “भारतातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आम्ही त्यांचा पाठीशी उभे” असल्याचे ट्वीट केले होते. या ट्विटचा उल्लेख करत उपप्रवक्ता फरहान हक यांनी “भारताला आरोग्य चाचण्यांसाठी आवश्यक उपकरणे, ८५ आरटी-पीसीआर यंत्रे, अन्य आरोग्यविषयक आवश्यक वस्तू आणि तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आम्ही देत आहोत” असे सांगितले. दरम्यान महाराष्ट्र आणि ईशान्य भारतात २५ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठी युनिसेफ मदत करणार आहे. याशिवाय भारतातील प्रत्येक बंदरात थर्मल स्कॅनरची उभारणी केली जात असल्याचेही हक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान भारताच्या मदतीसाठी अनेक देश, बड्या कंपन्या धावून आल्या असून ऑक्सिजन पुरवठा आणि आरोग्य सुविधा वाढण्यास मदत करत आहेत. यात देशात ऑक्सिजन निर्मितीचे २० प्रकल्प आणि २० क्रायोजेनिकचे कंटेनर वॉलमार्टकडून मिळणार आहे. याशिवाय कोरोनावरील उपाययोजनांसाठी वॉलमार्ट खासगी संस्थांना २० लाख अमेरिकी डॉलरचे अर्थसाह्य करणार आहे. दरम्यान वॉलमार्ट पहिल्या टप्प्यात तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारताला देणार असून भविष्यात २५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारताला देण्याची तरतूद केली आहे.

दरम्यान बोइंग या विमानसेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने भारताला १ कोटी अमेरिकी डॉलर तातडीचे अर्थसाह्य घोषित केले आहे. तर आघाडीची आंतरराष्ट्रीय पेमेंट कंपनी मास्टरकार्डने भारताला दोन हजार फिरत्या खाटा दिल्या आहेत. अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत केली जाणार असून यासाठी मास्टरकार्डने या फाउंडेशनला ८९ लाख अमेरिकी डॉलरचे अर्थसाह्य केले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -