घरदेश-विदेशकुंभमेळ्यात सापडला सीरियल किलर

कुंभमेळ्यात सापडला सीरियल किलर

Subscribe

मागील सहा महिन्यांमध्ये १० जणांचे खून करणाऱ्या सीरियल किलरला कुंभ मेळ्यात अटक करण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर या आरोपीला अटक केली आहे.

आतापर्यंत आपण अनेकदा कुंभ मेळ्यामध्ये दोन दुरावलेले भाऊ भेटण्याच्या गोष्टी ऐकल्या असतील. मात्र कुंभ मेळ्यात सीरियल किलर सापडण्याची गोष्ट पहिल्यांदाच समोर आली आहे. रस्त्यावर झोपलेल्या लोकांच्या डोक्यात रॉड घालून त्यांची हत्या करणाऱ्या एका सीरियल किलरला पोलिसांनी कुंभमेळ्यात अटक केली आहे. कुंभमेळ्याच्या गर्दीतून पोलिसांनी या सीरियल किलरला अटक केली आहे. या सीरियल किलरने केलेल्या हल्ल्यात ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याने केलेल्या हत्यांचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सध्या या सिरीयल किलरची चौकशी सुरु केली आहे. या सीरियल किलरवर ५० हजारांचे बक्षीस होते.

सीसीटीव्हीच्या मदतीने केली अटक

इलाहाबादच्या पोलिस अधीक्षक नितीन तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,”अटक आरोपीचे नाव सुभाष उर्फ साई बाबा (३८) असे आहे. साई बाबा इलाहाबाद जिल्ह्यातील लालपूर पोलीस ठाण्यातील बेसहारा गावातील रहिवासी आहे. हा सीरियल किलर रस्त्यावर झोपलेल्या लोकांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचे खून करत होता. त्याने केलेल्या हत्या या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत. सीसीटीव्हीच्या अधारावर आम्ही त्याचा चेहरा आम्ही ओळखला. या आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -