घरदेश-विदेशCovovax चाचणीसाठी सीरमला परवानगी; जाणून घ्या कोणत्या वयात मुलांना मिळणार लस

Covovax चाचणीसाठी सीरमला परवानगी; जाणून घ्या कोणत्या वयात मुलांना मिळणार लस

Subscribe

दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असताना संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लहान मुलांना कोरोनाची लस कधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. सीरम इन्स्टिट्यूट देशातील ‘कोवोव्हॅक्स’ नावाने अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीची लस तयार करत आहे. यापूर्वी, DCGI 12 ते 17 वयोगटातील मुलांवर ही लस चाचणी करण्यासाठी सीरमला मान्यता दिली होती. सीरमने 100 मुलांवरही त्याची चाचणी केली आहे. DCGI ला चाचणी डेटा प्रदान करण्यात आला आहे. कोरोना महामारीपासून मुलांना वाचवण्यासाठी लसी विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. DCGI आता सीरम संस्थेला 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी लस चाचण्या घेण्यास मान्यता दिली आहे.

मंगळवारी, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे पालन करून सीरमला 7 ते 11 वर्षे वयाच्या मुलांवर ही लस चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सच्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी अद्याप मान्यता मिळालेली नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीला, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी आशा व्यक्त केली की होती ती म्हणजे पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत 18 वर्षांखालील मुलांसाठी ‘कोवोव्हॅक्स’ ही लस मंजूर होईल.

- Advertisement -

भारतात फक्त 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी वापरण्यासाठी आपत्कालीन वापरासाठी फक्त झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी लस मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकच्या स्वदेशी लस ‘कोवॉक्सिन’ साठी आपत्कालीन वापर मंजुरीसाठी (ईयूए) आणखी काही डेटा मागितला आहे. यामुळे, या लसीसाठी जागतिक संस्थेची मान्यता मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो. यामुळे परदेशात जाणाऱ्या भारतीयांचा त्रास आणखी वाढला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -