घरCORONA UPDATEकाही दिवसांत भारतात येईन, Covishield लसीचे उत्पादन वेगाने सुरु- अदर पूनावाला

काही दिवसांत भारतात येईन, Covishield लसीचे उत्पादन वेगाने सुरु- अदर पूनावाला

Subscribe

भारतात कोरोनास्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतात लसीकरण मोहिम वेगाने व्हावी यासाठी अनेक राज्ये प्रयत्न करत आहेत. देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक कंपन्या कोरोनाविरोधी लस उत्पादन करत आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लस उत्पादित केली जात असून या लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अदर पूनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचे सांगत पुण्यातील लसी उत्पादन प्रकल्पात कोविशिल्ड लसीचे उत्पादन वेगाने सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.

यावर बोलताना पूनावाला असेही नमूद केले की, भारतात परतल्यानंतर कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाची समीक्षा करणार आहे. दरम्यान गेल्याकाही दिवसांपूर्वी अदर पूनावाला लंडनला निघून गेल्याचा बातम्या समोर आल्या आहेत. यावेळी द टाईम्स”ला मुलाखत दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी खळबळजनक गौप्यस्फोट करत खुलासा केला की, देशातील श्रीमंत आणि बड्या राजकीय हस्थींकडून मला धमकावण्यात येत आहे. कोरोना लसींचे आश्वासन पाळण्यात अडथळा येत असल्यामुळे लंडनमध्ये कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे ठरवले असल्याचे पुनावाला यांनी म्हटलंय. तसेच सतत येणारे फोन कॉल हे अत्यंत त्रासदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अदर पुनावाला यांनी फोन कॉलवरुन सांगितले की, देशातील शक्तिशाली नेते, व्यक्तींचे फोन मला येत आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यांचे, व्यावसायिक प्रमुखांचे कोविशिल्ड लसीच्या तात्काळ पुरवठ्याची मागणी करण्यासाठी फोन येत असतात. प्रत्येकाची लसीच्या मागणीची अपेक्षा वाढली आहे. लसीचा पुरवठा लवकर व्हावा यासाठी आग्रह करत माझ्याशी आक्रमक सूरात बोलले जात आहे. लस मिळवण्याची इच्छा आणि आक्रमकता यातील अंतर अभूतपूर्व असल्याचे अदर पुनावाला यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान अदर पूनावाला यांनी कंपनीचे पार्टनर्स आणि स्टेकहोल्डर्स यांची लंडनमध्ये भेट घेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत, आमचे पार्टनर्स आणि स्टेकहोल्डर्ससोबत महत्त्वपूर्ण बैठत उत्तम पार पडली. यात पुण्यात कोविशिल्डचं उत्पादन वेगाने होत असून काही दिवसांत मी परत येऊन उत्पादनाची समीक्षा करणार आहे असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पूनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अदर पूनावाला यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूटमधील एक अधिकारी प्रकाशकुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून तशी विनंती केली होती. यात पूनवाला यांना मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेता सुरक्षा किती महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. पूनावाला यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफवर सोपविण्यात आली आहे. या वाय दर्जाचा सुरक्षेत ११ जवान असतात. ज्यामध्ये एक किंवा दोन कमांडो आणि पोलिस कर्मचारी सहभागी असतात. ही सुरक्षा त्यांना देशभर देण्यात आली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -