घरदेश-विदेश'आता बूस्टर डोसची वेळ आली...'; कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात अदर पूनावालांचे महत्वाचे वक्तव्य

‘आता बूस्टर डोसची वेळ आली…’; कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात अदर पूनावालांचे महत्वाचे वक्तव्य

Subscribe

भारतात कोरोनाची स्थिती सुधारली असली तरी, परदेशात अद्याप कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अशातच कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, या कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेसंदर्भात पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महाराष्ट्राला कोरोना निर्बंधमुक्त केलं आहे. मात्र भारतात कोरोनाची स्थिती सुधारली असली तरी, परदेशात अद्याप कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अशातच कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, या कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेसंदर्भात पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “देशात कोरोनाची चौथी लाट जेव्हा केव्हा येईल तेव्हा ती सौम्य स्वरुपाची असेल. या संदर्भात मला कोणतेही भाकित करायचे नसून कोरोनाच्या नव्या म्यूटंट्सना आपल्या देशाने दिलेला प्रतिसाद पाहिल्यास देशातील लस इतर देशांमधील लशींच्या तुलनेत कितीतरी पटीने चांगली आहे”, असं पूनावाला यांनी म्हटलं.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी पुण्यात अल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्हला उपस्थित दर्शवली होती. यावेळी अदर पूनावाला यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ‘बूस्टर डोसबद्दल आम्ही काही महिन्यांपासून सरकारला आवाहन केले आहे. याचे कारण प्रवास करणार्‍या प्रत्येकाला बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. सरकारअंतर्गत देखील या संदर्भात चर्चा होत आहे. सरकार लवकरच बूस्टर धोरणाची घोषणा येत्या काही दिवसांत करेल असं वाटतं’, असे अदर पूनावाला यांनी यावेळी म्हटलं.

- Advertisement -

‘इतर सर्व देश बूस्टर डोस देत आहेत. आता भारताने देखील याकडे पाहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने विलक्षण काम केलं आहे. मोदी सरकारनं आधीच संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला दोन डोस देऊन सुरक्षित केलं आणि आता बूस्टरची वेळ देखील आली आहे. सीरमने यासंदर्भात आवाहन केले असून आम्हाला खात्री आहे, की सरकार बूस्टर डोसबाबत सकारात्मक निर्णय घेईल. चौथी लाट जेव्हा येईल तेव्हा ती सौम्य असेल, आणि मला कोणतेही भाकित करायचे नाही, परंतु, आपण नवीन म्यूटंट प्रकारांना आपल्या देशाने कसा प्रतिसाद दिला आहे हे पाहिल्यास आपल्या देशातील लशी इतर देशांच्या लशींपेक्षा कितीतरी पटीनं चांगल्या सिद्ध झाल्या आहेत. जगभरातील लशींच्या मिश्रणास बूस्टर डोससाठी परवानगी आहे. लशींचा पुरेसा साठा आहे आणि कोणतीही कमतरता भासणार नाही’, असंही यावेळी अदर पूनावाला यांनी म्हटलं.


हेही वाचा – Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागलं; वाढत्या इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -