घरदेश-विदेशCOVID-19: सीरम इन्स्टिट्यूट सप्टेंबरपासून Sputnik V लस निर्मितीला करणार सुरूवात

COVID-19: सीरम इन्स्टिट्यूट सप्टेंबरपासून Sputnik V लस निर्मितीला करणार सुरूवात

Subscribe

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम वेगाने चालविली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत ३८ कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस दिले गेले आहेत. तर दिलासादायक बाबा म्हणजे, आता रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचे उत्पादन भारतात सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट सप्टेंबरपासून रशियाच्या स्पुतनिक व्ही लस निर्मितीस सुरूवात करणार आहे. त्यामुळे देशात अधिक वेगाने नागरिकांचे लसीकरण केले जाईल आणि लसींचा भासणारा तुटवडा कमी होण्यास देखील मदत होईल.

कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत देशात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या स्वदेशी लस यापूर्वीच दिल्या जात आहे. त्याचबरोबर देशात रशियन लसीला मान्यता मिळाल्यानंतर आता भारतात तयार होण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) सप्टेंबरपासून अँटी-कोरोनाव्हायरस लस स्पुतनिक व्हीचे उत्पादन सुरू करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी असे सांगितले की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) सप्टेंबरपासून स्पुतनिक व्हीचे उत्पादन सुरू करणार आहे. काही इतर उत्पादकदेखील भारतात ही लस तयार करण्यास तयार आहेत. एका अहवालानुसार, रशियाच्या स्पुतनिक व्हीने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी दरवर्षी ३०० मिलियन डोस तयार करण्याचा करार केला आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर आरडीआयएफचे असे मत आहे की, लस उत्पादकांचे सप्टेंबर २०२१ मध्ये पहिल्या बँचसह दरवर्षी लसीच्या ३०० मिलियनपेक्षा जास्त डोसचे उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे. सध्या, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला रशियामधील गामालेया सेंटरकडून सेल आणि वेक्टरचे नमुने प्राप्त झाले आहेत. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मंजूर केलेल्या आयातीमुळे पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.


ड्रग्ज टाकून केकची विक्री, डॉक्टरला अटक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -