घरदेश-विदेशसीरम इन्सिट्यूट मुलांसाठी करणार Novavax लसीचं ट्रायल तर सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार Covavax...

सीरम इन्सिट्यूट मुलांसाठी करणार Novavax लसीचं ट्रायल तर सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार Covavax लस

Subscribe

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुलांसाठी नोव्हावॅक्स लसीची क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करीत आहे. जुलैपासून सीरम इन्स्टिट्यूट संस्था कोविड -१९ या लसीची चाचणी सुरू करणार आहे, असे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. यासह, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सप्टेंबरपर्यंत कोव्हाव्हॅक्स भारतात उपलब्ध करणार आहे. कोव्हावॅक्स हे नोव्हावॅक्सच्या संभाव्य कोविड लशीचे रूप आहे. यापूर्वी केंद्र सरकारनेही कोरोना विरूद्ध नोव्हाव्हॅक्स ही लस परिणामकारक असल्याचे वर्णन केले होते. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,
सार्वजनिकपणे उपलब्ध आकडेवारीही असे दर्शवते की, नोव्हाव्हॅक्स ही लस सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे.

- Advertisement -

यासह ते असेही म्हणाले, आज ही लस प्रभावी ठरवत असून ही लस भारतातील सीरम इन्स्टिट्यूट तयार करण्यात येणार आहे. या तयारीची संपूर्ण कामे सीरम इन्स्टिट्यूटने यापूर्वीच पूर्ण केली आहेत आणि ही यंत्रणा पूर्णत: कार्यान्वित करण्याच्या चाचण्या सुरू असून जे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नोव्हाव्हॅक्स यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, हे वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची त्यांची योजना आहे जेथे स्वतंत्र तज्ज्ञ त्याची तपासणी करणार आहेत. यानुसार, ही लस शरीराला कोरोना व्हायरस ओळखण्यासाठी प्रशिक्षित करते, विशेषत: कोरोना संसर्ग शरीरात रोखण्यासाठी आवश्यक असणारे स्पाइक प्रथिने आणि विषाणूंविरूद्ध लढायला तयार करतात.

नोव्हावॅक्स ही कोरोना लस प्रयोगशाळेत बनविलेल्या स्पाइक प्रोटीनच्या प्रतीपासून बनविली जाते आणि सध्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या इतर काही लसींपेक्षा ही लस भिन्न आहे. ही लस मानक रेफ्रिजरेटर तपमानावर ठेवली जाऊ शकते आणि त्याचे वितरण करणे देखील सोपे आहे.


Covid 19: भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी देणार ११३ कोटी; Google ची मोठी घोषणा
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -