घरCORONA UPDATE"भारत सोडून पळालो नाही...'' अदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांचे स्पष्टीकरण

“भारत सोडून पळालो नाही…” अदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांचे स्पष्टीकरण

Subscribe

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला आपल्या पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये आहेत. यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावालाही लंडनला गेल्याने अफवांना पेव सुटले आहे. अदर पूनावाला देश सोडून गेल्याचा वावड्या उठू लागल्या आहेत. परंतु यावर आता सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत मुलगा अदर पूनावाला देश सोडून गेल्याचे आरोप फेटाळून लावले आहे. आम्ही कुठेही पळून गेलो नसल्याचं त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

यावर बोलताना सायरस पुनावाला यांनी सांगितले की, “आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये जातो. जेव्हा अदर छोटा होता तेव्हापासून आम्ही कुटुंबिय मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लंडनला येतो. त्यामुळे माझा मुलगा देश सोडून पळून गेल्याचा अफवा उडाल्या आहेत. त्या सर्व बातम्या खोट्या आहेत. तसेच अदरवर होणारे आरोप खोटे आणि द्वेषपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नियमित सुट्टी घालवण्यासाठी तो तात्पुरते लंडनला आल्याचे त्याने सांगितले. मे महिन्यात भारताबाहेर वास्तव्य आम्ही येत असतो. प्रत्येकाला उन्हाळ्याची सुट्टी घालवायची असते. त्यामुळे लंडनमध्ये येणं ही काय आमच्यासाठी नवीन बाब नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनाविरोधी कोविशील्ड लसीचे उत्पादन केले जात आहे. आत्तापर्यंत या कंपनीत सर्वाधिक लसींचे उत्पादन केले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसींचे उत्पादन कमी होत असल्याचे आरोप करण्यात आले. याचदरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनला पळून गेल्याचा अफवा रंगू लागल्या. त्यानंतर अदर पुनावाला यांनी एका मुलाखतीत मला देशातील बडे राजकीय नेते, मुख्यमंत्री आणि मोठे उद्योगपतींचे लस देण्यासाठी धमक्यांचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, आणि पुनावाला भीतीपोटी भारत सोडून गेल्याचा चर्चा रंगू लागल्या.

यानंतर अदर यांनी लंडनमध्ये तात्पुरत्या कामानिमित्त आल्याचे सांगत लवकरच भारत भेटीची योजना आखत असल्याचे
ट्वीट त्यांनी १ मे रोजी केले. यात त्यांनी युरोपमध्ये कंपनीच्या विस्तारासाठी वाटाघाटी सुरूच आहेत. युरोपमध्ये कंपनी काही नवीन योजना सुरू करण्याच्या विचारात आहे, असेही पूनावाला म्हणाले. ते म्हणाले की, कोरोना लसचे उत्पादन भारतात सुरू आहे. आम्ही युरोपमधील मॅन्युफॅक्चरिंग युनिटशी बोलत आहोत. या दिशेने ठोस निर्णय घेताच आम्ही माहिती उपलब्ध करुन देऊ असेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -