घरCORONA UPDATEआता Serum तयार करणार Sputnik V लस, DCGI कडे मागितली परवानगी

आता Serum तयार करणार Sputnik V लस, DCGI कडे मागितली परवानगी

Subscribe

येत्या काळात सीमर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतात रशियन स्पुटनिक लस तयार करण्याची शक्यता

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अँस्ट्रोजेनका यांच्या सहाय्याने कोविशिल्ड (Covishield) लस तयार करणारी पुण्याची सीमर इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) कंपनी आता रशियाची स्पुतनिक व्ही (Sputnik V ) लस तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही लस तयार करण्यासाठी सीरमने चाचणी विश्लेषण आणि परीक्षाणासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे आता येत्या काळात सीमर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतात रशियन स्पुटनिक लस तयार करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने स्पुटनिक व्ही लसीला आपत्कालीन वापरसाठी परवानगी दिली. डॉ. रेड्डीज प्रयोगशाळांध्ये स्पुटनिक व्ही लसींची निर्मिती केली जात आहे. (Serum will manufacture Sputnik V vaccine, DCGI requested permission)

सीरम इन्स्टिट्यूटने याआधीही केंद्राला दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात सीरम १० कोटी कोव्हिशिल्ड लसीचे डोस तयार करणार आहे. सध्या नोव्हावॅक्स लसीची निर्मिती केली जात आहे. या लसीला अमेरिकेकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे.

- Advertisement -

रशियन डायरेक्टर इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF)ने दिलेल्या माहितीनुसार, स्पुटनिक व्ही लसीला १४ मे रोजी भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. RDIFने असे म्हटले आहे की, स्पुटनिक व्ही लसीच्या दोन डोसांच्या लसीपेक्षा सिंगल डोस असलेली स्पुटनिक लाइट लस सर्वात जास्त प्रभावी आहे. सिंगल डोस असलेली स्पुटनिक लाइट (Sputnk Light) ही लस वृद्ध व्यक्तींमध्ये जवळपास ८३ टक्के  लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी हैद्राहादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रशियन निर्मित स्पुटनिक लसीचे ३० लाख डोस दाखल झाले आहेत. ६.६ टन वजनाची लस आतापर्यंत भारतात आयात केलेली सर्वात मोठी लस आहे. स्पुटनिक लस शून्य ते २० डिग्री सेल्सियस तापमानात ठेवण्यात येते. डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळेने रशियन डारेक्टर इन्व्हेस्टमेंट फंड सोबत स्पुटनिक व्ही लसीच्या १२.५ कोटी डोस विकण्याचा करार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Johnson & Johnson पावडरमुळे कॅन्सर; १४,५०० कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -