घरCORONA UPDATEफेब्रुवारी-मार्चपर्यंत सीरमची कोविशिल्ड लस बाजारात येईल; अदर पुनावाला यांचा दावा

फेब्रुवारी-मार्चपर्यंत सीरमची कोविशिल्ड लस बाजारात येईल; अदर पुनावाला यांचा दावा

Subscribe

सीरमची कोविशिल्ड लस फेब्रुवारी-मार्चपर्यंत बाजारात येईल, असा दावा सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केला आहे. सरकारच्या खरेदीच्या आदेशाची वाट पाहतोय, असं अदर पूनावाला म्हणाले. रविवारी DCGI ने सीरमच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. DCGI ने रविवारी पत्रकार परिषदेत घोषणा केली. DCGI एकूण दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरमची कोविशिल्ड या दोन लसींना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेचा मार्ग मेकळा झाला आहे.

कोविशिल्डचे पाच कोटी डोस वितरणासाठी तयार आहेत. सरकारच्या खरेदीच्या आदेशाची वाट पाहतोय. कोरोनाची लस फेब्रुवारी-मार्चपर्यंत बाजारात येईल. लसीचा कोणतेच गंभीर दुष्परिणाम नाही आहेत. दीर्घ संरक्षणासाठी दोन डोस आवश्यक असतील. तीन महिन्यांत ही लस ९० टक्के प्रभावी आहे, असं अदर पूनावाला म्हणाले. दरम्यान, परवानगी मिळायच्या आधीच सीरमने पाच कोटी डोस तयार केले आहेत. त्यामुळे लसीचं काम किती वेगात सुरु आहे, हे यावरुन दिसून येत आहे.

- Advertisement -

याआधी अदर पूनावाला यांनी लसीच्या वितरणासाठी आम्ही तयार आहोत, असं म्हटलं होतं. पूनावाला यांनी ट्विट करत नविन वर्षआच्या शुभेच्छा दिल्या. पुढे ट्विटमधअये म्हटलं की, निकाल लागला आहे, सीरम संस्थेने ही लस तयार करण्यास जोखीम घेतली. देशातील पहिली कोरोना लस मंजूर झाली आहे, जी सुरक्षित, प्रभावी आणि आगामी काळात वितरणासाठी सज्ज आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -