घरदेश-विदेश'टाल्कम पावडरमुळे कॅन्सर'चे दावे निकाली काढण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून सेटलमेंटची ऑफर

‘टाल्कम पावडरमुळे कॅन्सर’चे दावे निकाली काढण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून सेटलमेंटची ऑफर

Subscribe

नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सन (jonson and jonson) ही अमेरिकेतील सर्वात मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असून या कंपनीचे जगभरात जाळे पसरले आहेत. गेल्या काही वर्षांपासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या टॅल्कम पावडर उत्पादनांमुळे कर्करोग होतो असा दावा करणारे खटले निकाली काढण्यासाठी मंगळवारी (४ एप्रिल) कंपनीकडून 890 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 73,086 कोटी) च्या सेटलमेंटची ऑफर दिली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून सेटलमेंटची दिलेली ऑफर कोर्टाने आणि कंपनीवर केस करणाऱ्या लोकांनी मंजूर केली, तर 8.9 बिलियन डॉलर्स सेटलमेंट ही युनायटेड स्टेट्समधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सेटलमेंटपैकी एक असेल. फक्त तंबाखू कंपन्या आणि अगदी अलीकडे ओपिओइड उत्पादकांनी कोर्टाला सेटलमेंटच्या ऑफर दिल्या आहेत.

- Advertisement -

जॉन्सन अँड जॉन्सन विरुद्ध हजारो खटले कोर्टात प्रलंबित आहेत. कंपनीच्या टॅल्कम पावडरमध्ये ऍस्बेस्टोसचे अंश आहेत, ज्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो असा आरोप हजारो लोकांकडून करण्यात आला आहे. मात्र कंपनीने हा आरोप कधीही मान्य केला नाही. पण मे 2020 मध्ये कंपनीने यूएस आणि कॅनडामध्ये टॅल्कम पावडर आधारित बेबी पावडरची विक्री थांबवली होती. जॉन्सन अँड जॉन्सनच्या खटल्यांचे उपाध्यक्ष एरिक हास यांनी एका निवेदनात सांगितले की, “कंपनीचा विश्वास आहे की हे दावे खोटे आहेत आणि त्यात वैज्ञानिक तथ्ये नाहीत”

सेटलमेंट कोणत्याही चुकीच्या कामाची कबुली नाही
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने सांगितले की, त्याची उपकंपनी LTL व्यवस्थापन LLC द्वारे पुढील 25 वर्षांमध्ये हजारो तक्रारदारांना 890 अमेरिकन दशलक्ष डॉलर्स देतील. हे दावे हाताळण्यासाठी LTL मॅनेजमेंट LLC ची स्थापना करण्यात आली आहे आणि दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून यापूर्वीही सेटमेंटचा प्रस्ताव दिला होता. कंपनीच्या LTL व्यवस्थापन LLC चा समावेश असलेली पूर्वीची 200 दशलक्ष डॉलर्सची सेटलमेंट ऑफर कोर्टाने नाकारली होती.
पण यावेळी कंपनी सांगते की, ”ही नवीन प्रस्तावित सेटलमेंट कोणत्याही चुकीच्या कामाची कबुली नाही आणि कंपनी अजूनही दावा करते की त्यांची टॅल्कम पावडर उत्पादने सुरक्षित आहेत. त्यामुळे कंपनी आणि सर्व भागधारकांच्या हिताचे आहे की, या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -