घरदेश-विदेशमायदेशी परतण्यासाठी काबुल विमातळावर नागरिकांची तुफान गर्दी, चेंगराचेंगरीत सात अफगाणींचा मृत्यू

मायदेशी परतण्यासाठी काबुल विमातळावर नागरिकांची तुफान गर्दी, चेंगराचेंगरीत सात अफगाणींचा मृत्यू

Subscribe

सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटनच्या लष्करातर्फे देण्यात आली आहे.

तालिबान्यांनी ( Taliban) अफगाणिस्तानवर (Afganistan) ताबा मिळवल्यापासून तिथे अडकलेले भारतीय मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याकरीता काबुल विमानतळावर अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. यादरम्यान विमानतळावर नागरिकांची झुंबड पाहता चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यामध्ये सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटनच्या लष्करातर्फे देण्यात आली आहे. सध्या तालिबानमध्ये जागोजागी तणावपूर्वक वातावरण असून नागरिकांना वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. चार दिवसांपूर्वी काबुल विमानतळावर गोळीबार झाल्याने यामध्ये पाच अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. हवेत अचानकपणे गोळीबाराच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला असून गोळीबार नेमकं कोणत्या ठिकाणाहून आणि कोणी केला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती कळू शकली नाहीये.(Seven Afghans killed in Kabul airport stampede)

अफगाणिस्तामध्ये अडकेल्या भारतीयांना परत आणले.

अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचे अथक प्रयत्न सुरू आहेत. ‘वंदे भारत’ (Vande Bharat) या मोहिमेतंर्गत अफगाणिस्तामधील भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात येत असून C-17 ग्लोबमास्टर विमान (C-17 Globemaster aircraft) आज रविवारी अफगाणिस्तानहून भारतात दाखल झाले आहे. (C-17 Globemaster aircraft arrives in India from Afghanistan) अफगाणिस्तामधून १६८ भारतीयांना घेऊन या विमानाने उड्डाण केले. आज हे विमान गाझियाबादच्या हिंडोन विमानतळात दाखल झाले आहे. सरकारच्या वंदे भारत मोहिमेला वेग अला असून १६८ भारतीयांची अफगाणिस्तानधून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हे भारतीय नागरिक विमानतळावर पोहचताच त्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली.काबुल विमानतळावरुन दररोज दोन विमानांना उड्डाण करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आत C-17 हे विमान भारतात दाखल झाले आहे. आतापर्यंत अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या ३५०-४०० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आले आहे. असे असले तरी ८०० ते ९०० भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा- अफगाणिस्तानात अकडकलेले भारतीय मायदेशी परतणार, भारताला काबूलमध्ये दररोज दोन विमान उड्डाणांना परवानगी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -