घरदेश-विदेशबिहारमध्ये वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट; सात मजुरांचा मृत्यू

बिहारमध्ये वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट; सात मजुरांचा मृत्यू

Subscribe

मोतिहारी येथील रामगढवाच्या नरिलगिरी येथे हा स्फोट झाला.  या स्फोटाचा आवाज सर्वदूर गेला होता. स्फोटाच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. स्फोटामुळे लागलेल्या आगीचा धूर सर्वत्र पसरला होता. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य सुरु केले. मृतांची ओळख पटवण्यात आली आहे.

पाटनाः बिहार येथील एका वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला आहे. १६ जण जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखाली दोन डझनहून अधिकजण अडकल्याची भीती आहे. पोलिसांचे मदत व बचाव कार्य सुरु आहे.

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येईल व जखमींचा सर्व उपचार खर्च सरकार करेल, असे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी जाहिर केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे.

- Advertisement -

मोतिहारी येथील रामगढवाच्या नरिलगिरी येथे हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज सर्वदूर गेला होता. स्फोटाच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. स्फोटामुळे लागलेल्या आगीचा धूर सर्वत्र पसरला होता. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य सुरु केले. मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. मृतांमध्ये चारजण स्थानिक आहेत तर तीनजण उत्तर प्रदेशचे आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मी व्यथित झालो आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन लाखांची मदत व जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन सांगितले.

शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. वीटभट्टीच्या खाली कच्च्या विटा रचण्याचे काम मजूर करत होते. भाजण्यासाठी या विटा रचण्याचे काम सुरु होते. त्यावेळी अचानक तेथे स्फोट झाला. पोलिसांनी बचावकार्य तत्त्काळ सुरु केले व मृतेदह तत्काळ बाहेर काढले. मात्र रात्री थंडीमुळे बचाव कार्यात अडथळा आला. सकाळी पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात आले. याची चौकशी करण्यासाठी तीन पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक स्फोटाची व नुकसानाची चौकशी करणार आहे. हा चौकशी अहवाल लवकरच सादर होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -