धक्कादायक! ‘या’ राज्यात कोरोनाच्या भितीने केली सात जणांनी आत्महत्या

कोरोना व्हायरसच्या नुसत्या भितीनेच उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

suicide

कोरोना व्हायरसच्या नुसत्या भितीनेच उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांत तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून मार्चमध्ये चार जणांनी आपले जीवन संपल्याचे समजते. नुकतेच आत्महत्या केलेल्या तीनपैकी एक जण उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील सरकारी कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय शामली आणि बरेलीमध्ये उर्वरित दोघांनी आत्महत्या केल्याचे समजते.

हेही वाचा – धक्कादायक! लॉकडाऊन अखेरीस कोरोनाची संख्या १० हजारपर्यंत जाणार

काय आहेत आत्महत्येची कारण 

सहारनपूरमधील ३८ वर्षीय लिपीकाने शेरमऊ परिसरात ऊस विकास परिषदेच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी पंख्याला लटकून आत्महत्या केली. या इसमाच्या खिशातून सुसाईड नोट मिळाली असून यामध्ये कोरोना व्हायरसा संसर्ग होण्याची भिती वाटत असल्याचे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने लिहिले होते. याप्रकरणी सहारनपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच शामली जिल्ह्यातही ३५ वर्षीय भाजी विक्रेत्याने क्वारंटाइन वॉर्डमध्ये गुरूवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली असून ते टेस्टिंगसाठी मेरठच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. हा व्यक्ती दिल्लीमध्ये भाजी विकण्याचे काम करत होता. ३० मार्च रोजी आजारी असल्यामुळे तो त्याच्या गावी आला. दुसऱ्याच दिवशी त्याने आरोग्य विभागाशी संपर्क साधत स्वतः हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. त्यानंतर त्याला क्वारंटाइन विभागात ठेवण्यात आले. आज त्याच्या चाचणीचा अहवाल येणार होता. मात्र त्यापूर्वी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. तर बरेलीमध्ये २३ वर्षीय प्रवासी मजूर क्वारंटाइन सेंटरमधून पळून गेला असता पोलीस त्याचा शोध घेतल्याचे समजल्याने त्याने आत्महत्या केली.