घरदेश-विदेशहॉटेलचे सेफ्टीटँक साफ करताना ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

हॉटेलचे सेफ्टीटँक साफ करताना ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

वडोदरा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर फर्तिकुई गावामध्ये ही घटना घडली आहे. या गावामध्ये असलेल्या एका हॉटेलचे सेफ्टीटँक सफाईचे काम सुरु होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलचे सेफ्टीटँक साफ करत असताना गुदमरुन चार सफाईकामगारांसह ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वडोदरा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर फर्तिकुई गावामध्ये ही घटना घडली आहे. या गावामध्ये असलेल्या एका हॉटेलचे सेफ्टीटँक सफाईचे काम सुरु होते. साफसफाई करत असताना गुदमरुन ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी किरण झवेरी यांनी सांगितले की, सेफ्टीटँकची साफसफाई करण्यासाठी एक कामगार मॅनहोलमध्ये उतरला होता. तो बाहेर न आल्यामुळे इतर कामगार त्याला पाहण्यासाठी खाली उतरले. त्यावेळी सर्वांचा सेफ्टीटँकमध्ये जीव गुदमरला यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

- Advertisement -

पोलिसांनी हॉटेलच्या मालकाविरोधात दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले या कामागारांचा मृत्यू एकमेकांना शोधण्याच्या नादात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन हॉटेलचे सेफ्टिटँक साफ करण्यासाठी महेश पतनवडिया, अशोक हरिजन, बृजेश हरिजन आणि महेश हरिजन आले होते. तिथे हॉटेलचे काम करणारे तीन कर्मचारी विजय चौधरी, सहदेव वसावा आणि अजय वसावा हे देखील मदतीसाठी आले होते.

सुरुवातीला सेफ्टी टँकमद्ये महेश पतनवडिया हे साफसफाईसाठी उतरले. खूप वेळानंतर ते बाहेर आले नाही तसेच त्यांचा काहीच आवाज न आल्यामुळे अशोक, बृजेश आणि महेश त्यांना पाहण्यासाठी सेफ्टिटँकमध्ये उतरले. ते सुध्दा बाहेर न आल्यामुळे हॉटेलचे तीन कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी खाली उतरले असता ते सुध्दा बेशुध्द होऊन सेफ्टिटँकमध्ये पडले आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. जेव्हा हे ७ ही जण बाहेर न आल्यामुळे या घटनेची माहिती दाभोई नगर पालिका आणि स्थानक पोलिसांना देण्यात आली. नगरपालिकेकडे मदतकार्यासाठी उपकरणे अपूरी पडत असल्यामुळे वडोदरा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्ळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढण्या आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -