घरदेश-विदेशजगात येण्याआधीच काळाचा घाला; भीषण अपघातात गर्भवतीसह ७ जणांचा जागीच मृत्यू

जगात येण्याआधीच काळाचा घाला; भीषण अपघातात गर्भवतीसह ७ जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

कर्नाटक येथील कलबुर्गी येथे एका भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. कारची धडक एवढी जोरदार होती की कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठवले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार सावळगी गावाजवळ ट्रक उभा होता. दरम्यान, मागू येणाऱ्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात गर्भवती महिलेसह ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. गर्भवती महिला इरफाना बेगम (२५), रुबिया बेगम (५०), आबेडबी (५०), जैचुनबी (६०), मुनीर (२८), मोहम्मद अली (३८) आणि शौकत अली (२९) अशी मृतांची नावं आहेत. याप्रकरणी कलबुर्गी शहरातील वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -