घरदेश-विदेशअँटिबायोटिक आणि कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त, आरोग्य मंत्रालयाकडून नवी यादी जारी

अँटिबायोटिक आणि कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त, आरोग्य मंत्रालयाकडून नवी यादी जारी

Subscribe

नवी दिल्ली : अत्यावश्यक औषधे स्वस्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने नवी यादी जारी केली असून त्यात आयवरमेक्टिन, मुपिरोसिन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरेपी यासारखी काही संक्रमणप्रतिबंधक औषधांचा त्यात समावेश केला आहे. यात 384 औषधांचा समावेश असून अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीन, सुक्रालफेट, व्हाइट पेट्रोलेटम, एटेनोलोल आणि मेथिल्डोपा यासह 26 औषधांची नावे वगळण्यात आली आहेत.

अत्यावश्यक औषधांच्या यादीत अँटिबायोटिक्स, लसी आणि कॅन्सर प्रतिबंधक औषधे स्वस्त होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी अत्यावश्यक औषधांची यादी जारी केली. यात 27 श्रेणीतील 384 औषधांचा समावेश आहे. या औषधांच्या किमती कमी झाल्याने रुग्णांचा खर्चाचा भार कमी होणार आहे.

- Advertisement -

फ्लूड्रोकोरटिसोन, ऑरमेलॉक्सिफेन, इन्सुलिन ग्लेरझिन, टेनेलाइटिन तसेच मॉन्टेलुकास्ट (श्वसनासंबंधी), लॅटानोप्रोस्ट (नेत्ररोगासंबंधी) कार्डियोवॅस्कुलर, डबीगट्रान. टेनेक्टेप्लेस हेही या यादीत आहेत. आवश्यक औषधांच्या यादीत आयवरमेक्टाइन, मेरोपेनेम, सेफुरोक्साइम, एमिकासिन, बेडाक्विलाइन, डेलामेनिड, इट्राकोनाजोल एबीसी डोलटेग्रेविर यासारखी औषधांचा समावेश करण्यात आल्याचे स्थायी राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष डॉ. वाय. के. गुप्ता यांनी सांगितले. कॅन्सरचा धोका लक्षात घेऊन अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीन हे औषध यादीतून वगळण्यात आले आहे. या औषधावर जगभरात संशोधन होत आहे.  एसीलोक, जिनेटॅक आणि रँटेक नावाने हे औषध बाजारात विकली जाते.

- Advertisement -

अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीन व्यतिरिक्त अल्टेप्लेस, एटेनोलोल, ब्लीचिंग पावडर, कॅप्रोमायसीन, सेट्रिमाइड, क्लोरफेनिरामाइन, दिलोक्सॅनाइड फ्यूरोएट, डिमेरकाप्रोलो, एरिथ्रोमायसीन, एथिनील एस्ट्राडीयोल, एथिनिल एस्ट्राडियोल (ए) नोरेथिस्टरोन (बी), गॅनिक्लोवीर, कनामायसीन, लॅमिवुडिन (ए) + नेविरापीन (बी) + स्टावूडीन (सी), लेफ्लुनोमाइड, मेथिल्डोपा, निकोटिनामाइड, पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2ए, पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2बी, पेंटामिडाइन, प्रिलोकेन (ए) + लिग्नोकेन (बी), प्रोकार्बाजिन, रिफाब्यूटिन, स्टावूडीन (ए) + लॅमिवुडीन (बी), सुक्रालफेट, पेट्रोलेटम या औषधांना वगळण्यात आले आहे.

गेल्या वर्षी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अंतर्गत तज्ज्ञांच्या समितीने 399 औषधांची सुधारित यादी सादर केली होती. त्याचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मंडाविया यांनी यात मोठे बदल सुचविले होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -