घरताज्या घडामोडीSex for Oxygen : माझ्यासोबत झोप, तुझ्या वडिलांना ऑक्सिजन मिळवून देतो

Sex for Oxygen : माझ्यासोबत झोप, तुझ्या वडिलांना ऑक्सिजन मिळवून देतो

Subscribe

हाय प्रोफाईल सोसायटीतील व्यक्तीच्या मागणीमुळे ट्विटर हादरलं !

कोरोनाच्या महामारीत जशा प्रकारे माणुसकी जिवंत असल्याची जाणीव करून देणारी उदाहरणे समाजातून समोर आली. तशाच प्रकार माणुसकीचा अंत पाहणारीही उदाहरणे समोर आली आहेत. ऑक्सिजन असो वा रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवणे असो लाखो रूपयांचा भ्रष्टाचार, ब्लॅके मार्केटिंग, बेड्स मिळवून देण्यासाठी पैसे उकळल्याचे सगळे प्रकार आतापर्यंत समोर आले. पण त्यामध्येही एक अतिशय धक्कादायक असे उदाहरण समोर आले आहे ते म्हणजे ऑक्सिजनच्या मोबदल्यात शरीर सुखाचीमागणी करण्याचे. एका उच्चभ्रू वस्तीतील व्यक्तीकडून मुलीच्या वडिलांना ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्याच्या अटीवर ही शरीरसुखाची मागणी समोर आल्याने ट्विटरही पुरते हादरले आहे. अनेक जणांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. एका ट्विटरवरील युजरनेच हा अनुभव उघडकीस आणला आहे. ही घटना घडल्याचे ठिकाणी कळले नसले, तरीही ट्विट करणारी व्यक्ती ही दिल्लीतील असावी असे प्रथमदर्शनी दिसले आहे.

- Advertisement -

एका ट्विटर युजरने ट्विट करत या घटनेची माहिती आहे. त्या व्यक्तीने म्हटले आहे की, माझ्या छोट्या बहिणीसारख्या एका मुलीला तिच्या वडिलांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची गरज होती. त्या उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची खरेदी करण्यासाठीची ती तयारी करत होती. उपचारासाठी ऑक्सिजन तत्काळ लागणार असल्याने त्या मुलीने काही जणांकडे मदतीची विचारणा केली होती. त्यावेळी एका उच्चभ्रू वस्तीतील व्यक्तीने ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्या तुलनेत मला शरीरसुख हवय अशी मागणी केली. त्या मुलीला आलेला अनुभव तिने त्या ट्विटर युजरला सांगितला. भवरीन खंदारी या ट्विटर युजरने हा अनुभव ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ट्विटवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. अशा प्रकारच्या शरीरसुखाच्या मागणीमुळे ट्विटर युजरने संतापही व्यक्त केला आहे. काही जणांनी या व्यक्तीविरोधात पोलिस तक्रार करण्याची मागणी केली आहे. तर अशा व्यक्तीचे नाव उघड व्हायला हवे अशीही मागणी काही जणांनी केली आहे. त्या व्यक्तीला राहत्या ठिकाणच्या रेसिडंट वेल्फेअर असोसिशएनने प्रश्न विचारायला हवेत अशीही मागणी काही जणांनी केली आहे. तर काही जणांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे की, गरजू असलेली गरीब मुलगी पाहून हा संधीसाधूपणा केला असावा. अशा प्रकारच्या घटना दररोज घडत असाव्यात समाजात, पण या व्यक्तींविरोधात कोणीही बोलत नाही. ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागास असल्यानेच तिच्याविरोधात अन्याय होऊनही याची दखल घेतली गेलेली नाही.

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीत अडचणीत आलेल्या व्यक्तींबाबतच्या अनेक घटना परदेशातूनही समोर आल्या होत्या. युकेमध्ये घरमालकांनी त्यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या मुलींकडून कोरोनाच्या महामारीत भाडे थकवल्याने शरीरसुखाची मागणी केली होती. या मागणीला नकार देणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागले होते. त्यामध्ये घर सोडण्यापासून ते रस्त्यावर आल्याची उदाहरणेही समोर आली होती. मुंबईतील एका महिलेने आपल्या कुटूंबातील व्यक्तीसाठडी प्लाझ्मा डोनेशनसाठी मागणी करताना आपला मोबाईल नंबर दिला होता. त्यानंतर महिलेला अनेक प्रकारचे मॅसेज, कॉल्स आणि फोटो लोकांनी पाठवले. ज्यामुळे मदत मिळण्याएवजी त्या महिलेच्या अडचणीत आणखी भर पडली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -