घरदेश-विदेशहस्तमैथून, सेक्स; हे तर..., पोप फ्रान्सिस स्पष्टचं बोलले

हस्तमैथून, सेक्स; हे तर…, पोप फ्रान्सिस स्पष्टचं बोलले

Subscribe

 

नवी दिल्लीः देवाने दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी सेक्स ही एक गोष्ट आहे, असे मत ८६ वर्षीय पोप फ्रान्सिस यांनी मांडले आहे. हे मत मांडत असाताना पोप फ्रान्सिस यांनी हस्तमैथून, सेक्स, पॉर्न यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

- Advertisement -

हस्तमथूनबाबत पोप फ्रान्सिस म्हणाले, सेक्सद्वारे स्वतःला व्यक्त करणे ही समृद्धता आहे. सेक्सची भावना विचलीत करणारी गोष्ट ही समृद्धता कमी करते. मुळात देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी सेक्स ही एक गोष्ट आहे.

पोप फ्रान्सिस यांचा माहितीपट बुधवारी प्रसिद्ध झाला. या माहितीपटात पोप फ्रान्सिस यांनी समलैंगिक अधिकार, लैंगिक अत्याचार, गर्भपात, पॉर्न, सेक्स या विषयांवर आपली मते मांडली. कॅथलिक चर्चने समलैंगिक समुहाला नाकारले आहे. कॅथलिक चर्चने खरं तर समलैंगिक समुहाचे स्वागतच करायला हवे. सर्व देवाची मुले आहेत. देव कोणाला नाकारत नाही. देव पिता आहे. कोणालाही नाकारण्याचा मला अधिकार नाही, असे मत पोप फ्रान्सिस यांनी मांडले. गर्भधारणा संपुष्टात आलेल्या महिलांबद्दल धर्मगुरुंनी दयाळू असायला हवे, असा सल्लाही पोप फ्रान्सिस यांनी दिला.

- Advertisement -

गेल्या वर्षी पोप हे रोम दौऱ्यावर होते. तेथे त्यांची २० वर्षीय १० तरुणांसोबत मिटींग झाली. या मिटींगचे अनुभव पोप फ्रान्सिस यांनी माहितीपटात सांगितले आहेत. सध्या हे अनुभव चर्चेचा विषय बनले आहेत.

याआधीही पोप फ्रान्सिस यांनी सेक्सवर भाष्य केले आहे. लेखक कार्लो पेट्रिनी यांच्या टोरफ्यूचूरा (TerraFutura) या पुस्तकासाठी पोप फ्रान्सिस यांनी मुलाखत देताना जेवण आणि सेक्सबद्दल हे वक्तव्य केले होते. ‘उत्कृष्ट जेवण हे तुम्हाला सुदृढ ठेवण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे सेक्समधून मिळणार आनंद हा प्रेम अधिक सुंदर होण्यासाठी होतो. तसेच सेक्स आपल्या पुढील पिढ्यांच्या निर्मितीसाठी गरजेचा आहे. त्यामुळे उत्कृष्ट जेवण आणि सेक्समधून मिळणारा आनंद हा दैवी असतो’, असे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले होते.

उत्कृष्ट जेवण आणि सेक्स यासंदर्भात यापूर्वी करण्यात आलेल्या दाव्यांवर आणि विचारांवर पोप फ्रान्सिस यांनी टीका केली होती. या गोष्टी अधिक पवित्र आणि नैतिक असल्याचे त्यांनी म्हटले होते. जुन्या विचारांमुळे उत्कृष्ट जेवण आणि सेक्स या विषयांचे खूप नुकसान झाले आहे आणि याची झळ आजही जाणवत असल्याचे पोप फ्रान्सिस यांनी सांगितले होते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -