घरदेश-विदेशMeToo चळवळीमध्ये अनेक सेलिब्रिटींवर लैंगिक शोषण

MeToo चळवळीमध्ये अनेक सेलिब्रिटींवर लैंगिक शोषण

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या #MeToo चळवळीमध्ये अनेक सेलिब्रिटींवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले जात आहेत. हे आरोप त्यांच्यासोबत काम केलेल्या महिला सेलिब्रिटिंनी केल्यामुळे बॉलिवुडमध्ये खळबळ माजली आहे.

साजिदकडून कपडे उतरवण्याची मागणी : सिमरन कौर

दिग्दर्शक साजिद खानवर अनेकींकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप होत आहेत. त्यात आता आणखी भर पडली असून अभिनेत्री सिमरन कौर सूरी हिने साजिदने आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचे म्हटले. ‘हिम्मतवाला’ चित्रपटामधील भूमिकेसाठी साजिदने मला स्वत:हून फोन करुन ऑडीशनसाठी बोलावले होते. त्यावेळी त्याने मला कपडे उतरवायला लावले असे तिने एका खासगी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. चित्रपटातील भूमिकेसाठी विचारणा केल्याने ही अतिशय व्यावसायिक स्वरुपाची भेट असेल असे मला वाटलेे. मात्र साजिद त्याच्या घरातल्या कपड्यांमध्ये होता. त्याचे असे वागणे पाहून मला धक्का बसला. त्यामुळे मी त्या ठिकाणाहून निघून गेल्याचे तिने सांगितले. चित्रपटात भूमिका द्यायची असल्यास मला अभिनेत्रीचे शरीर पाहणे आवश्यक असते असे साजिदने सांगितले. साजिदवरील आरोपांमध्ये वाढ होत असताना त्याच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटात काम करणार नसल्याचे अभिनेता अक्षयकुमार याने सांगितले होते. तर साजिदची बहिण असलेल्या फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं फराह खाननं म्हटलं आहे.

नाना पाटेकरांची नार्को टेस्ट करा- तनुश्री दत्ता

बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी तनुश्री दत्ताने केली आहे. यासंदर्भात तनुश्रीने शनिवारी ओशिवरा पोलिसांना अर्ज केला. ओशिवरा पोलिसांनी या दोघांचा जवाब नोंदवला आहे. यावर आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागेल असे पोलिसांनी सांगितलेे. कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतरच पोलिस नार्को टेस्ट करु शकणार आहे. तनुश्रीने वकिलाच्या माध्यामातून ही मागणी केली.काही दिवसांपासून सुरु असलेल्या आरोपाला या मागणीने एक नवीन वळण लागले आहे.

- Advertisement -

समाजात महिलांचे स्थान उच्च – अनिल कपूर

आज महिला #MeToo च्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला उघडपणे वाचा फोडत आहेत. त्यामुळे आपण त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. ‘महिलांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. समाजात त्यांचे एक स्थान आहे. त्यामुळे त्यांचे विचार, मते आपण ऐकली पाहिजेत तरच त्या खर्‍या अर्थाने स्वतंत्र होतील. समाजात त्यांचे स्थान समानतेचं नाही तर उच्च आहे. माझ्या घरातही महिला आहेत. मी कायम त्यांच ऐकतो. त्यामुळे आज त्या माझ्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

आलोक नाथ यांच्यासोबतचा अनुभव भयंकर – हिमानी शिवपुरी

चित्रिकरणादरम्यान आलोक नाथ माझ्या खोलीत आले. त्यांनी भरपूर दारु प्यायली होती. मी खूप घाबरुन गेले, मी छोट्या शहरातून आलेली अभिनेत्री होते. ते माझ्याशी गप्पा मारताना काहीही बरळत होते आणि आपण दारु प्यायलोच नाही अशा अविर्भावात वावरण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना माझ्या खोलीतून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी जाण्यास नकार दिला. मग रडू लागले आणि जोरजोरात आरडाओरडा केला. मग इतर लोक आले आणि त्यांना तिथून घेऊन गेले. माझ्यासाठी हा अनुभव भयंकर होता, असा आरोप अभिनेत्री हिमानी शिवपुरी हिने केला. आलोक नाथ यांच्यासोबत हिमानी शिवपुरीने ‘हम साथ साथ है’ आणि ‘परदेस’ या सिनेमांमध्ये काम केले. या सिनेमांवेळी आलोक नाथ यांचा वाईट अनुभव आल्याचे हिमानीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. दुबईमध्ये असताना एका पुरस्कार सोहळ्यात ते दारू पिऊन आले. त्यांची पत्नी त्यांच्या या गोष्टीमुळे खूप तणावाखाली आली होती. एकदा त्यांना उघड्यावर लघुशंका करतानाही पकडले गेले होते. तर उद्धटपणा केल्याने विमानातून उतरवण्यात आले होते असेही हिमानी शिवपुरी यांनी सांगितले.

- Advertisement -

ऐश्वर्याचं ‘ते’ ट्विट व्हायरल

#MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या प्रकरणांविषयी व्यक्त होत आहेत. तर दुसरीकडे या मोहिमेचा गैरवापरही होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या नावाने एक बनावट ट्विट व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वीची ऐश्वर्याने #MeToo प्रकरणावर जाहीरपणे तिचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर काही काळातच सोशल मीडियावर तिच्या नावाची एक ट्विटर पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये तिने बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्यावर अप्रत्यक्षरित्या आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे व्हायरल होत असलेली ही पोस्ट ऐश्वर्याची नसून तिच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार केल्याचे दिसून येत आहे. व्हायरल होत असलेली फेक पोस्ट @TheGuruGhantal या ट्विटर युजर्सच्या प्रोफाईलमधून शेअर केली आहे. दरम्यान, ऐश्वर्याचा सोशल मीडियावर फारसा वावर नसतो. आजही तिचे ट्विटरवर कोणतेही अधिकृत खाते नाही. त्यामुळे #MeToo या मोहिमेचा अनेक जण गैरफायदा घेत अफवा पसरवत असल्याचे समोर आले आहे.

विकास बहलच्या पत्नीला कंगनाचे सडेतोड उत्तर

कंगनाचे आरोप ऐकल्यानंतर विकासची पत्नी ऋचा दुबेने कंगनावर जोरदार हल्ला चढविला होता.
अभिनेत्री कंगना रणौतने दिग्दर्शक विकास बहलवर आरोप केल्यानंतर विकासची पत्नी ऋचा दुबेने कंगनावर जोरदार हल्ला चढविला होता. तेव्हापासून या दोघींमध्ये शीतयुद्ध सुरु झाले. आता कंगनानेही ऋचाला प्रत्युत्तर दिले. माझा पती इतका वाईट आहे तर मग तितकी वर्षे तू त्याच्याशी मैत्री का ठेवलीस? असा प्रश्न ऋचाने कंगनाला विचारला आहे. या प्रश्नावर कंगनाने तिच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. ‘विकासवर गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर ऋचा आज त्याच्या मदतीला आली आहे. जर खरेच तुला विकासवर एवढा विश्वास होता तर मग त्याच्यापासून विभक्त का झालीस? आता आम्ही सामंजस्याने विभक्त झालो आहोत, अशी उत्तर देऊ नकोस’, असे कंगना म्हणाली.

अकबर मला पकडून जबरदस्तीने चुंबन घेत होते – सीएनएन पत्रकार

देशातील अनेक महिला पत्रकारांनी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केलेले असताना आता अमेरिकेतील एका महिला पत्रकाराने अकबर यांच्यावर आरोप केला. माजीली डी प्यु कॅम्प असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती सीएसएन वृत्तवाहिनीत काम करते. २००७ मध्ये मी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम करत असताना अकबर यांनी आपला लैंगिक सुखासाठी छळ केला होता असा आरोप माजीलीने केला. त्यावेळी ती १८ वर्षांची होती. हफिंगटॉन पोस्टच्या वृत्तानुसार माजीली कॅम्प त्यावेळी अकबर यांच्या हाताखाली एशियन एजमध्ये पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत होती. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी मला संधी दिली म्हणून मी आभार मानण्यासाठी अकबर यांच्या केबिनमध्ये गेली. त्यावेळी ही घटना घडली असे माजीली कॅम्पने सांगितले. मी आभार मानण्यासाठी हात पुढे केला अकबर यांनी मला जवळ खेचले व माझे चुंबन घेतले. ते माझ्यावर चुंबनाची जबरदस्ती करत होते. मी तशीच तिथे उभी होते असे कॅम्पने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

#MeTooचा कॉर्पोरेटने घेतला धसका

कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये स्त्रीयांवर होणारा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी २०१३मध्ये पॉश कायदा संमत करण्यात आला. या कायद्या अंतर्गत स्त्रीयांशी गैरवर्तणूक करणार्‍या कठोर शिक्षेची तरतूद आहे. पण या कायद्याच्या तरतूदी आणि त्याचे बारकावे खूप कमी लोकांना माहित आहेत. यासाठीच महिला कर्मचार्‍यांची जागृती करण्यासाठी अनेक कंपन्या कार्यशाळा आयोजित करत असतात. काही लिगल कंपन्या,सेवाभावी संस्था या कार्यशाळांमधून महिलांचे प्रबोधन करतात.

भारतीय क्रिकेटलाही आता ’मीटू’ची लागण

मीटू चे वादळ बॉलीवूडपाठोपाठ आता भारतातील क्रिकेटमध्येही धडकले आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या सार्‍या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेने बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पण याबाबत कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. पण आता एका महिला पत्रकाराने जोहरी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने जोहरी यांनी आपली बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे.

Me Too बिग बींचं बिंगही लवकरच फुटणार?

मी टू वादळाच्या भोवर्‍यात मोठमोठे सेलिब्रिटी कलाकार अडकत चालले आहेत. आता सिने इंडस्ट्रीचा बादशाह बिग बी अमिताभचं नाव पुढे येत आहे. अर्थात अद्याप कोणीही त्यांच्यावर आरोप केला नसला तरी त्यांच्या अन्यायाचे पाढेही लवकरच वाचले जातील असे सूचक ट्विट हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी हिने केले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी मी टू मोहिमेबद्दल आपली भूमिका मांडली होती. कोणत्याही महिलेशी अशा प्रकारचे वर्तन व्हायला नको, असे ते म्हणाले होते. यानंतर भवनानी हिने त्यांच्यावर हल्लाबोल केला. मी टू बाबत आपली भूमिका मांडणारी पोस्ट अमिताभ यांनी लिहिली होती. ती शेअर करत भवनानी हिने लिहिलं, ’हे कदाचित जगातल सर्वात मोठं खोटं असेल. सर, पिंक सिनेमा प्रदर्शित होऊन गेलाय. तुमची कार्यकर्त्याची प्रतिमाही अशीच संपणार आहे. तुमचं सत्यही लवकरच बाहेल येईल.’

#MeToo सईला पुण्यातील प्रकरणाबाबत विचारणा

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही ट्विटरच्या माध्यमातून या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला होता. मात्र तिच्या या मतप्रदर्शनावर अनेकांनी मत व्यक्त करत तिला पुण्यातील एका जुन्या प्रकरणाची आठवण करुन देत ‘दारु पिऊन धिंगाणा घालणारी अभिनेत्री’ अशा शब्दात तिला रिप्लाय केला. या रिप्लायला सईने सडेतोड उत्तर दिले आहे. तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही नरकातच सडणार असं ट्विट सईने करत विनता नंदा आणि मी टू मोहीमेला पाठिंबा दर्शवला. या संदर्भातील बातम्या ट्विट झाल्यानंतर एका वाचकाने सईला टॅग करून, ‘आहो पण पुण्यात फ्लॅटमध्ये रात्री दारु पिऊन जो धिंगाणा घातलेला त्याचेही बोला जरा’ असे ट्विट केले. या ट्विटला सईनेही सडेतोड शब्दात उत्तर दिले. आलोक नाथ यांच्यावर भाष्य करणारी सई नाना पाटेकरांवरील आरोपांवर काहीच बोलली नाही, अशी टीका तिच्यावर झाली. या टीकाकारांना सईने सडेतोड उत्तर देत, ‘मराठी असण्याचा प्रश्न नाही; जे चूक आहे ते चूकच आहे’ अशा शब्दात आपली भूमिका मांडली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -