Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश लैंगिक अत्याचार प्रकरण: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

लैंगिक अत्याचार प्रकरण: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

रंजन गोगोई यांची फसवणूक केली जात असल्याच्या मतावर न्यायालय ठाम

Related Story

- Advertisement -

देशाची माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देणारा निर्णय दिला आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्यांवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते यावर सुनावणी करत रंजन गोगोई यांच्यावरील प्रकरण रद्द करण्यात आले आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावरुन सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावर सुनावणी करणारे माजी न्यायाधीश ए के पटनायक समितीकडे देण्यात आली होती. या प्रकरणात पुढे तपास झाला नाही त्यामुळे रद्द करण्यात येत आहे. या आधीही रंजन गोगोई यांना सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चीट दिली होती.

न्यायालयाने असेही म्हटले आहे की, ए के पटनायक पॅनल भारताच्या माजी सरन्यायाधीस रंजन गोगोई यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. मागील २ वर्षांपासून हे प्रकरण सुरु आहे. या प्रकरणातील पुरावे अजूनही सादर करता आले नाही. व्हॉटसऐप मॅसेज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयासमोर सादर करता आले नाही. आता खूप विलंब झाला आहे. त्यामुळे रंजन गोगोई यांना फसवण्यासाठी कट रचण्यात येत असून हे प्रकरण रद्द करण्यात आल्याचे न्यायालयाने निर्णय दिला आहे.

- Advertisement -

रंजन गोगोई यांची फसवणूक केली जात असल्याच्या मतावर न्यायालय ठाम आहे. कारण रंजन गोगोई यांनी एनआरसी सारख्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. या निर्णयामुळे नाराज झालेल्यांनी हे कटकारस्थना रचले असू शकते. यासाठी आईबी की रिपोर्टचा वापर करण्यात आला आहे. या सर्व गोष्टींवर विचार करुन न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले आहे.

काय होते प्रकरण

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. हा आरोप गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे सर्वोच्च न्यालयाने याची गंभीर दखल घेतली होती. परंतु या प्रकरणाला दोन वर्ष झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरणच रद्द करुन टाकले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून रंजन गोगोई यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -