मेलबर्न : या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यदिना निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगा फडकवण्यात आला. ‘द इंडियन फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2023’मध्ये शबाना आझमींनी ध्वजारोहण केले.
यावेळी शबाना आझमी म्हणाल्या, “तिरंगा फडकवण्याचा सन्मान मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान आहे. मी मेलबर्नमध्ये ध्वजारोहण करण्याची संधी ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. चित्रपट हे समाज परिवर्तनाचे एक साधन आहे,” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या ‘घूमर’ या चित्रपटात शबाना आझमींनी काम केले आहे. या चित्रपटाचे ‘द इंडियान फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2023’मध्ये वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. या पार्श्वभूमीवर घूमर’ चित्रपटाची टीम मेलबर्नमध्ये गेली आहे. द डंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2023 हा 11 ऑगस्टला सुरू झाला असून 20 ऑगस्टला संपणार आहे. हा फेस्टिवलला ऑस्टेलियामध्ये खूप महत्त्व आहे.
हेही वाचा – Mann Ki Baat 103 : मोदी म्हणाले, ‘शहीदांच्या सन्मानात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान; यंदाही ‘हर घर तिरंगा’
शहीदांना नमन करणारे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांच्या सन्मानात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान सुरु करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, देशात सध्या अमृत महोत्सावाची चर्चा आहे. 15 ऑगस्ट जवळ येत आहे. शहीद वीर आणि वीरांगणांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना सन्मान देण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान सुरु केले जाईल. या अभियानातून देशभरातील शहीदांना नमन केले जाईल. त्यांचे स्मरण केले जाईल. देशातील लाखो ग्राम पंचायतींमध्ये विशेष शिलालेख स्थापन केले जातील.