घरताज्या घडामोडीस्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला फाशी, गंभीर गुन्ह्यामुळे राष्ट्रपतींनीही कायम ठेवली होती...

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला फाशी, गंभीर गुन्ह्यामुळे राष्ट्रपतींनीही कायम ठेवली होती फाशी

Subscribe

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडली नाही अशी घटना शबनम या महिलेल्या बाबतीत घडणार आहे. येत्या काही दिवसांमध्येच शबनमने केलेल्या एका गुन्ह्यासाठीच्या शिक्षेने देशात एक मोठा इतिहास नोंदवला जाणार आहे. काही दिवसातच शबनमने केलेल्या गुन्ह्यासाठी एका महिलेला फाशीची शिक्षा देण्याचा हा पहिलाच प्रकार असेल. आपल्याच कुटुंबातील सात जणांची कुऱ्हाडीने अतिशय क्रूरपणे हत्या करण्याचा प्रकार या गुन्ह्याच्या निमित्ताने समोर आला होता. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात २००८ साली ही घटना घडली होती. प्रेमात अतिशय वेड्यापिसा झालेल्या शबनने आपल्या प्रियकराच्या सोबतीने हा गुन्हा केला होता. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर या भागातील बावनखेडी गावातील राहणारी ही महिला आहे. शबनम सध्या बरेलीच्या कारागृहात या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. (Shabnam and Salim will hang to death for rare rest crime of axing seven family members)

कसा घडला गुन्हा ?

शबनमते वडील शौकत अली हे प्राध्यापक होते. तर शबनम ही कुटुंबातील एकुणती एक मुलगी होती. शबनमला तिच्या पित्याने अतिशय चांगल्या प्रकारचे असे शिक्षण दिले होते. तिचे शिक्षण एम ए पर्यंत पुर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांची मोठी मेहनत होती. आपले एमएचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर शबनम शिक्षण सेवक झाली. एका गावात तिचे शिक्षण सेवक म्हणून काम सुरू असतानाच त्यादरम्यानच शबनम आणि सलीम दरम्यान प्रेमाचे नाते तयार झाले. त्या दोघांच्या प्रेमाला दोन्ही कुटुंबातून विरोध होता. म्हणूनच तिने दोन्ही कुटुंबातील विरोध करणाऱ्यांना कुऱ्हाडीचा वापर करून हत्या करून संपवले. या घटनेत तिने स्वतःचे वडील मास्टर शौकत, आई हाशमी, भावांमध्ये अनीस आणि राशीद, वैनी असलेली अंजुम आणि बहिण राबियाला कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तर आपल्या अवघ्या दहा महिन्याच्या अर्श नावाच्या भाच्याचाही तिने गळा दाबून जीव घेतला. या घटनेचे पडसाद संपुर्ण देशभरात उमटले होते. या हत्येनंतर शबनम ही बरेली जेलमध्ये शिक्षा भोगत आहे, तर तिचा प्रियकर सलीम आगरा जेलमध्ये आहे.

- Advertisement -

असा चालला खटला 

या घटनेतील दोषी शबनमला फाशी देण्यासाठी मथुरा जेल प्रशासनाने फासावर लटकवण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. तर घटनेत दोषी असलेल्यांना फाशी देण्यासाठीचा दोरखंडपासून सगळ्या गोष्टींची व्यवस्था जेल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या संपुर्ण हत्याकांडाची सुनावणी ही अमरोहाच्या न्यायालयात दोन वर्षे आणि तीन महिने सुरू होती. त्यानंतर १५ जुलै २०१० रोजी जिल्हा न्यायाधीश एसए हुसैनीने या प्रकरणात शिक्षा सुनावत सलीम आणि शबनमला फाशी देण्याची शिक्षा सुनावली. या संपुर्ण प्रकरणात १०० तारखांसाठी शबनम आणि सलीमने हजेरी लावली. जवळपास २९ जणांचा जबाब नोंदवल्यानंतर १४ जुलै २०१० रोजी शबनम आणि सलीमला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर १५ जुलै २०१० रोजी न्यायाधीश एसए हुसैनी यांनी दोघांनाही केवळ २९ सेकंदात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यातील २९ लोकांना ६४९ प्रश्न विचारण्यात आले होते. जवळपास १६० पानी निकाल न्यायालयाने दिला होता.

राष्ट्रपतींनीही कायम ठेवली शिक्षा

सलीम आणि शबनमने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने आणि राष्ट्रपतींनीही या प्रकरणातील फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यामुळेच आता या प्रकरणात सलीम आणि शबनम हे फासावर लटकवले जाणार हे स्पष्ट आहे. सध्या फाशी कधी द्यायची याची तारीख निश्चित नसली तरीही आमच्याकडून तयारी सुरू झाली आहे असे मथुराच्या जेल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील डेथ वॉरंट जारी होताच फाशी देण्यात येईल असे जेल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -