Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी किंग खानचे हृदयस्पर्शी ट्वीट

New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी किंग खानचे हृदयस्पर्शी ट्वीट

Subscribe

शाहरुख खाननेही ट्वीट करून संसदेच्या नव्या इमारतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांने नवीन संसद भवनासंदर्भात एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केलेला #MyParliamentMyPride हा हॅशटॅग देखील वापरला आहे. यासोबतच पीएम मोदींचे आवाहन लक्षात घेऊन शाहरुख खाननेही व्हिडिओला आपला 'व्हॉईसओव्हर' दिला आहे.

New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (ता. 28 मे) नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाला वैदिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याबाबत देशात प्रचंड उत्सुकता आहे. प्रत्येकाला या प्रसंगाचे साक्षीदार व्हायचे आहे. त्याचवेळी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबत बॉलिवूड जगतातील लोकही खूप उत्सुक आहेत. बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळख असलेला शाहरुख खान याने सुद्धा नवीन संसद भवनाचा व्हिडिओ शेअर करत एक ट्वीट केले आहे. (King Khan’s heartwarming tweets at Inauguration of New Parliament Building)

हेही वाचा – संसद भवनाच्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन

- Advertisement -

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनापूर्वी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने ट्विट केले आहे की, “आपल्या संविधानाचे समर्थन करणाऱ्या, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विविधतेचे रक्षण करणाऱ्या लोकांसाठी किती आश्चर्यकारक आहे हे नवीन संसद भवन. नवीन भारतासाठी नवीन संसद भवन… भारताच्या अभिमानाचे जुने स्वप्न. जय हिंद! #MyParliamentMyPride”

- Advertisement -

ट्वीट करतच शाहरुख खानने नवीन संसद भवनाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तसेच, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नवीन संसद भवनासंदर्भात एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी जारी केलेला #MyParliamentMyPride हा हॅशटॅग देखील या ट्वीटमध्ये वापरला आहे. यासोबतच पीएम मोदींचे आवाहन लक्षात घेऊन शाहरुख खाननेही व्हिडिओला आपला ‘व्हॉईसओव्हर’ दिला आहे.

शाहरुख खानसोबत अक्षय कुमारनेही आपल्या व्हॉईस ओव्हर देत नवीन संसद भवनाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “नवीन संसदेचे फोटो पाहून मला एक वेगळाच आनंद मिळत आहे. मला आठवते, मी जेव्हा दिल्लीत माझ्या आई-वडिलांसोबत राहत होतो तेव्हा इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूला जायचो. तेव्हा बहुतेक इमारती ब्रिटिशांनी बांधल्या होत्या. हे लोकशाहीचे मंदिर आहे. हीच नव्या भारताची ओळख आहे. असा भारत जो केवळ संस्कृती आणि वारशातच आघाडीवर राहिला नाही, तर आता प्रगती आणि विकासाने पुढे जात आहे. हे संसद भवन पाहिल्यावर आपला देश कुठे होता आणि आता किती पुढे गेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवावे. यासोबतच त्यांनी पीएम मोदींचे अभिनंदनही केले आहे.]

- Advertisment -