घरदेश-विदेशविमान प्रवासात महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला अटक

विमान प्रवासात महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला अटक

Subscribe

न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवासात एका ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केल्याचा मिश्रावर आरोप आहे. तो अमेरिकन कंपनी वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचा उपाध्यक्ष आहे. गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मात्र या घटनेची माहिती उघड झाली नव्हती. अखेर पीडित महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन् यांना पत्र लिहिले. या घटनेचा सर्व तपशील पत्रात नमूद केला. कारवाईची मागणी केली. त्यांनतर याप्रकरणाची चौकशी सुरु झाली. त्यावेळी ही घटना उजेडात आली. या घटेनुमळे सर्वच थक्क झाले.

नवी दिल्लीः विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला शनिवारी दिल्ली पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्याला नोकरीवरुनही काढून टाकले आहे.

न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवासात एका ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केल्याचा मिश्रावर आरोप आहे. तो अमेरिकन कंपनी वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचा उपाध्यक्ष आहे. गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मात्र या घटनेची माहिती उघड झाली नव्हती. अखेर पीडित महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन् यांना पत्र लिहिले. या घटनेचा सर्व तपशील पत्रात नमूद केला. कारवाईची मागणी केली. त्यांनतर याप्रकरणाची चौकशी सुरु झाली. त्यावेळी ही घटना उजेडात आली. या घटेनुमळे सर्वच थक्क झाले.

- Advertisement -

ज्येष्ठ महिलेवर लघुशंका करणारी व्यक्ती मिश्रा असल्याचे तपासात उघड झाले. त्याला शोधण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या घटनेची माहिती उघड होताच मिश्रा फरार झाला होता. या घटनेमुळे माझे कुटुंब त्रस्त झाले आहे, असा दावा मिश्राने केला होता. त्याचवेळी मिश्राला कामावरुन काढल्याचे पत्रक तो काम करत असलेल्या कंपनीने शुक्रवारी जारी केले. मिश्राच्या अडचणीत अजूनच वाढ झाली. शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांंनी मिश्राला बंगळूरु येथून अटक केली. वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयात हजर केले जाईल. पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलीस त्याची  कोठडी घेतील.

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. पीडित महिला एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला जात होती. घडलेल्या विचित्र घटनेचा तपशील महिलेने पत्रात नमूद केला. दुपारच्या जेवणानंतर विमानातील लाइट्स बंद करण्यात आले. त्याचवेळी एक मद्यधुंद प्रवासी सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतरही तो प्रवासी माझ्या जवळच उभा राहिला. त्यावेळी सहप्रवाशाने समज दिल्यानंतर तो तेथून गेला. परंतु, लघुशंकेमुळे कपडे, बॅग, शूज पूर्णपणे भिजले होते. लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली, असे पीडित महिलेने पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर या घटेनेचा तपास सुरु झाला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -