घरदेश-विदेशराम मंदिर लढ्यातील शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन

राम मंदिर लढ्यातील शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन

Subscribe

नरसिंहपूर – शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते द्वारकेचे शारदा पीठ आणि ज्योर्तिमठ बद्रीनाथचे शंकराचार्य होते.

शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला होता. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जात होते. शेवटच्या क्षणी शंकराचार्यांचे अनुयायी आणि शिष्य त्यांच्या जवळ होते.

- Advertisement -

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म –

- Advertisement -

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्माचा प्रवास सुरू केला.

यादरम्यान ते उत्तर प्रदेशातील काशीलाही पोहोचले आणि येथे त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज वेद-वेदांग हे धर्मग्रंथ शिकले. 1942 च्या काळात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते क्रांतिकारी संन्यासी म्हणून प्रसिद्ध झाले. कारण त्यावेळी देशात इंग्रजांपासून स्वातंत्र्य लढा चालू होता.

1950 मध्ये दंड सन्यासाची दीक्षा –

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी 1950 मध्ये ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंदर सरस्वती यांच्याकडून दंड सन्यासाची दीक्षा घेतली होती. 1981 मध्ये त्यांना शंकराचार्य उपाधी देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली –
‘जाज्वल्य अध्यात्मिक, परखड पारमार्थिक अशा धर्मानुरागीचा इहलोकीचा प्रवास थांबला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘धर्मकार्यालाच स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आयुष्य मानले. जाज्वल्य अध्यात्म आणि परमार्थ याबाबत ते परखड विचारांचे होते. त्यांचे उपदेश, विचार पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेच राहतील. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. ओम शांती!
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -