घरदेश-विदेशPM Modi Sharad Pawar Meet: शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट, नेमकी...

PM Modi Sharad Pawar Meet: शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट, नेमकी चर्चा काय?

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा, तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह संजय राऊत यांच्यावर पडलेल्या धाडीची भेटीच चर्चा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद देण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचं वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्लीः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अचानक भेट घेतल्यानं देशाच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरत आहे. संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भेट झाली असून, दोन्ही नेत्यांच्या भेटीत जवळपास 25 मिनिटे चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीने कारवाईचं धाडसत्र लावलंय. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही बैठक दोघांमध्ये वन-टू-वन झाली असून, भेटीदरम्यान इतर कोणतेही नेतेही उपस्थित नव्हते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा, तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह संजय राऊत यांच्यावर पडलेल्या धाडीची भेटीत चर्चा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद देण्यासंदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल संजय राऊतांवर ईडीनं कारवाई करत त्यांचे अलिबागमधील 8 भूखंड आणि दादरमधील राहतं घर जप्त केलं होतं. त्यानंतर आज शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

- Advertisement -

येत्या जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता असून, त्यासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे त्यासंदर्भात मोदी आणि पवार भेटीत चर्चा झाली नाही ना, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या होत्या. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, अशा पवारांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड मारली होती. विशेष म्हणजे पार्थ पवार यांच्या घरीही धाड टाकण्यात आली होती, त्यावर तर भेटीत चर्चा झालेली नाही, यासंदर्भातही चर्चा केली जात आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी ही भेट घेतली असावी- प्रवीण दरेकर

विशेष म्हणजे या भेटीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनीही प्रतिक्रिया दिलीय. केंद्रीय तपास यंत्रणांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असावी. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी ही भेट घेतली असावी. महाराष्ट्रात सध्या अराजकतासदृश परिस्थिती आहे. काँग्रेसच्या आमदारांमध्येही नाराजी आहे. महाविकास आघाडी विस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे, असंही प्रवीण दरेकर म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचाः महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त अन् कारभार काढून घेण्यासाठी मोठा संघर्ष, त्रास होईल, परंतु घाबरू नका, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -