घरदेश-विदेशSharad Pawar On Modi : मोदींचं आजचं भाषण ऐकून दुःख झालं; शरद...

Sharad Pawar On Modi : मोदींचं आजचं भाषण ऐकून दुःख झालं; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Subscribe

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खासदार शरद पवार म्हणाले की, सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच भाषण सुरू होतं. जेव्हा जेव्हा पंतप्रधान बोलतात तेव्हा आम्ही आमच्या जागेवर उठत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकल्यानंतर आज मला दुःख झालं.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी दिवंगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. त्यांच्या या टीकेला खासदार शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधानानी देशाच्या पहिल्या पंतप्रधानांवर अशी टीका करणं चुकीचं असून, आजचं त्यांचं भाषण ऐकून दुःख झाल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली. (Sharad Pawar On Modi Sad to hear Modis speech today Sharad Pawar expressed regret)

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खासदार शरद पवार म्हणाले की, सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच भाषण सुरू होतं. जेव्हा जेव्हा पंतप्रधान बोलतात तेव्हा आम्ही आमच्या जागेवर उठत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकल्यानंतर आज मला दुःख झालं. देशाचे पंतप्रधान हे एका पक्षाचे नाही तर ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्यावर असते. परंतु त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू असे पंतप्रधान होऊन गेले की, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या जीवनातील अनेक वर्ष ही कारागृहात काढली. देशाच्या विकासासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांना दुर्लक्षित करू शकत नाही असेही खासदार शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Narendra Modi: ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची हमी नाही ते मोदींच्या गॅरंटीवर बोलतात; मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर नरेंद्र मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना शरद पवार पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी असो, जवाहरलाल नेहरू यांचं प्रत्येकाचं देशासाठी विकासात योगदान आहे. नरेंद्र मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली आहे. पुढे बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, सध्या देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. झारखंडमधील मुख्यमंत्री जे एक वेगळी भूमिका घेत होते, त्यांचे उदाहरण दिले.

- Advertisement -

हेही वाचा : MSRDC : एमएसआरडीसीला उत्तम प्रशासन देईन! डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची ग्वाही

सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. असहिष्णुता वाढली असून, आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल बेरोजगारी वाढली असल्याने वैफल्यग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. या मुद्द्यावर काम करावं लागेल, असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये अधिकार महत्त्वाचे असतात, चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे. चुकीचा कार्यक्रम असो की, मग चुकीचं काम असो. चुकीला विरोध केला पाहिजे. मी आता एक तास पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं, त्यामध्ये मोदींच्या भाषणात समाजात एकता निर्माण व्हावी यासाठी काही नव्हतं असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -