घरदेश-विदेशजल्लोष कशाला? आपलं घर सांभाळण्यासाठी कारवाई - शरद पवार

जल्लोष कशाला? आपलं घर सांभाळण्यासाठी कारवाई – शरद पवार

Subscribe

भारताकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय वायूसेनेचं अभिनंदन केलं आहे.

भारतीय वायू सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांची तळं उद्धवस्त केली आहेत. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्याची माहिती देशातील नागरिकांना कळताच संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, या हल्ल्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिल्ली आहे. माध्यामांशी बोलताना शरद परवार यांनी भारतीय वायू सेनेचे कौतुक केले आहे. भारतीय वायू सेनेचा आपल्याला गर्व असल्याचेही शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर देशभरात जल्लोष साजरी केला जात आहे. यावर पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘जल्लोष कशाचा? आपल्याला आपलं घर सांभाळायचं आहे. आपलं घर सांभाळण्यासाठी आपण ही कारवाई केलेली आहे.’

भारतीय वायू सेनेचं अभिनंदन – पवार

याला सर्जिकल स्ट्राईक म्हणायचं का? असा प्रश्न जेव्हा शरद पवार यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘काही दहशतवादी वारंवार हल्ला करत होते. त्यांना चोख उत्तर दिले आहे.’ यापुढे पावर म्हणाले की, ‘आम्हाला भारतीय सेनेचा अभिमान वाटतो. यावेळी त्यांना चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. ते भारतीय सेनेने दिलेलं आहे. भारतीय वायुसेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरुन दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात २०० ते २५० दहशतवादी मारले गेले आहेत. हा हल्ला करत्यावेळी भारतीय वायूसेनेनं सीमारेषा न ओलांडता पाकिस्तानला तक्रार करण्याची संधी देखील दिलेली नाही. हे काम भारतीय वायूसेनेनं केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना अभिनंदन देतो.’ यावेळी आता विरोधी पक्षदेखील सरकार सोबत राहील का? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, ‘मला विश्वास आहे की, सर्व राजकीय पक्षा सरकारच्या सोबत राहतील.’

- Advertisement -

भारतीय सेनेला सलाम! – शरद पवार

या हल्ल्याची माहिती समोर येताच शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन प्रतिक्रिया दिली. त्यांनी भारतीय सेनेला सलाम केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -