Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत Share Market : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी पाण्यात

Share Market : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी पाण्यात

Subscribe

जागतिक स्तरावरील उलाढालीचा आज शेअर बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.

मुंबई : तुम्ही शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैशांची गुंतवणूक करु पाहत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, आज शेअर बाजारात मोठी उलाढाल झाली असून, सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या प्रमाणात घसरणीसह व्यवहार करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल पाच लाख कोटी रुपये बुडाले असल्याची माहिती आहे.

जागतिक स्तरावरील उलाढालीचा आज शेअर बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कमालीची घट झाली असून,सेन्सेक्समध्ये 1000 अंकाची तर निफ्टीमध्ये 300 अंकाची घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक आज 1.2 टक्क्याहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत असून एकूण बाजार भांडवलापैकी 5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

ही आहेत बाजारातील घसरणीची कारणे

- Advertisement -

FITCH ने US चे रेटिंग केले कमी,अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई बाजारात जोरदार विक्री,डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण,हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार विक्री या आणि इतर कारणाने शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले.

30 पैकी 3 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर 30 पैकी फक्त 3 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सवपैकी केवळ 4 शेअर्स तेजीत आहेत आणि उर्वरित 46 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Kuno National Park : कुनो नॅशनल पार्क बनतोय प्राण्यांसाठी घातक; आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू

या शेअर्सधारकांचे झाले वाटोळे

बीएसई सेन्सेक्सवर टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड, एचडीएफसी बँक, टायटन, आयटीसी, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये 1 टक्क्य़ांपेक्षा जास्त घसरण झाली.

- Advertisment -