घरताज्या घडामोडीStock Market Holiday: शेअर बाजाराला सर्वात मोठी सुट्टी, चार दिवस ट्रेडिंग राहणार...

Stock Market Holiday: शेअर बाजाराला सर्वात मोठी सुट्टी, चार दिवस ट्रेडिंग राहणार बंद; जाणून घ्या कारण

Subscribe

आजपासून पुढील चार दिवसांसाठी शेअर बाजार बंद राहणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार होणार नाहीये. चार दिवस ट्रेडिंग पूर्णपणे बंद राहणार आहे. आज १४ एप्रिल असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर उद्या शुक्रवार असून गुड फ्रायडे आहे. त्याचप्रमाणे १६ एप्रिल आणि १७ एप्रिल या तारखेला शनिवार आणि रविवार असल्यामुळे शेअर बाजार बंद राहणार आहे. ही शेअर बाजाराला मिळालेली सर्वात मोठी सुट्टी समजली जात आहे.

कमोडिटी मार्केटही राहणार बंद

कमोडिटी मार्केटबद्दल बोलायचे झाले तर, मल्टी कमोडिटी इंडेक्स ऑफ इंडियाच्या वतीने १४ एप्रिलला ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या भागाला सुट्टी मिळणार आहे. तर दुसऱ्या सत्रात व्यापार सुरू राहणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालते. दुसरे सत्र सकाळी ५ ते रात्री ११.५५ पर्यंत चालते. याशिवाय १५ एप्रिल रोजी दोन्ही सत्रांसाठी कमोडिटी मार्केट बंद राहणार आहे.

- Advertisement -

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळणार तीन सुट्या

भारतीय शेअर बाजार ३ मे २०२२ रोजी रमजान ईद निमित्त बंद असणार आहे. पुढील महिन्यात शेअर बाजाराला फक्त एकमेव सुट्टी मिळणार आहे. जर तुम्ही यादी पाहिली तर, ऑगस्ट २०२२ मध्ये, मोहरम, स्वातंत्र्य दिन आणि गणेश चतुर्थी सणांसाठी ९, १५ आणि ३१ ऑगस्ट रोजी शेअर बाजाराला सुट्ट्या असतील. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये ५, २४ आणि २६ तारखेला सुट्ट्या असतील. दसरा, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी या सणांसाठी तीन दिवस शेअर बाजारात बंद राहणार आहे.

मुहूर्त ट्रेडिंगची वेळ कधी?

मुहूर्त ट्रेडिंग २०२२ची वेळ नंतर सूचित केली जाणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये, गुरु नानक जयंतीसाठी ८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे.

- Advertisement -

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

दिवाळीला नवीन वर्षाची सुरूवात होते. भारतीय परंपरेनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये दिवाळीला नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात होते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील व्यापारी विशेष शेअर्स ट्रेड्रिंग करतात. म्हणून त्याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात.


हेही वाचा : Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील औषधाच्या कंपनीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -