घरताज्या घडामोडीShare Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला

Share Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला

Subscribe

जागतिक शेअर बजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. आज सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीमध्ये २५० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. तर आशियाई शेअर बाजारात देखील पडझड सुरू आहे. हँगसेंग निर्देशांक चार टक्क्यांनी कोसळला आहे. जागतिक स्तरावरही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशातील मध्यवर्ती बँकांकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत.

- Advertisement -

शेअर बाजारात व्यवहार सुरू असताना सेन्सेक्स ७७३.९४ अंकानी म्हणजे जवळपास १.३९ टक्क्यांची घसरला होता. सेन्सेक्स आज ५४,९२८.२९ अंकावर सुरू झाला आणि ५५ हजार अंकांच्या खाली घसरला आहे. रियल्टी शेअरमध्ये ३ टक्क्यांनी घसरला आहे. आयटी क्षेत्रात २.४४ टक्क्यांची घसरण दिसत आहे. मेटलमधील स्टॉकमध्ये २.३ टक्क्यांची घसरण दिसत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या स्टॉकमध्ये २.५७ टक्क्यांची घसरण दिसत आहे.

बाजारात सध्या सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरु आहे. सेन्सेक्समधील सर्वच्या सर्व ३० शेअरमध्ये घसरण झाली आहे. पॉवरग्रीड, आयटीसी, सन फार्मा, टेक महिंद्रा, महिंद्रा अॅंड महिंद्रा, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, विप्रो या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

- Advertisement -

निफ्टी मंचावर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. वोडाफोन, येस बँक, अदानी पॉवर, सेल, आयटीसी, पीएनबी, भारत हेवी इलेक्ट्रीकल्स, टाटा पॉवर, आयडीएफसी बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध अद्याप सुरुच आहे. मागील तीन महिन्यात या युद्धामुळे वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. तेलाचा भाव १०० डॉलर प्रती बॅरलवर आहे.


हेही वाचा : Maharashtra Security and Police Alert : भोंग्यांवरून राज्यात राजकारण तापलं, परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -