घरताज्या घडामोडीShare Market: बजेटच्या पूर्वीच शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी पडझड, जाणून घ्या

Share Market: बजेटच्या पूर्वीच शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी पडझड, जाणून घ्या

Subscribe

बजेटच्या पूर्वीच शेअर बाजारात आज(सोमवार) मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी पडझड झाल्याचे दिसून आले आहे. निफ्टीमध्ये ५५० अंकांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. तर १९०० अंकांनी सेन्सेक्स गडगडला आहे. शेअर बाजारात ओपन होताच सेन्सेक्समध्ये २५० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली.

जसजसं सत्र पुढे सरकत गेलं तसतसं बाजारात मोठी घसरण व्हायला लागली. दुपारी १२ वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षा जास्त घसरण झाली होती. दुपारी २.१५ वाजेपर्यंत सेन्सेक्स १९८३.०७ अकांनी वधारला. एनएसई निफ्टी जवळपास ६०० अंकांनी घसरून १७.०२० अंकांपर्यंत पोहोचलं होतं.

- Advertisement -

पुढील आठवड्यात सादर होणार बजेट

मागील पाच दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. २१ जानेवारी २०२२ रोजी कंपनीचा एक शेअर ४०८ रूपयांवर पोहोचला होता. याचदरम्यान बीएसई सेन्सेक्स १९ टक्क्यांनी वधारला आहे. जिंदाल फोटो ही एक होल्डिंग कंपनी असून सिक्युरिटीज कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.

सेन्सेक्सच्या तीस कंपन्या सध्या मोठ्या नुकसानीचा सामना करत आहेत. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टाटा स्टील, विप्रो, टायटन आणि बजाज फिनसर्व यांसारख्या कंपन्या ४.५ टक्के ६.१५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. रियल्टी सेक्टरमध्ये सुद्धा ६ टक्क्यांनी पडझड झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिंदाल फोटो शेअरचं मार्केट कॅपिटलायझेशन ४१८.५४ कोटी इतके रूपये आहे. मायक्रोकॅप स्टॉकनं शॉर्ट आणि लॉंग टर्ममध्ये मोठा परतावा मिळवून दिलाय. गेल्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड पहाता या स्कॉटनं जवळपास ४५० टक्के नफा मिळवून दिला आहे. त्यामुळे चालू महिन्यात ४१ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.


हेही वाचा : Ind Vs Sa : कर्णधारपदाच्या वादामुळे टीम इंडियाला धक्का?, आफ्रिका दौऱ्यात लाजीरवाणी कामगिरी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -