घरदेश-विदेशशशी थरूर यांच्या जाहिरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा! माफी मागून त्वरित केला बदल

शशी थरूर यांच्या जाहिरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा! माफी मागून त्वरित केला बदल

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडेच राहणार का, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. या निवडणूक रिंगणात मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि के. एन. त्रिपाठी हे तिघे उतरले आहेत. मात्र शशी थरूर यांनी जाहीरनामा जारी केला. पण त्यात भारताचा चुकीचा नकाशा दिला होता. पण नंतर माफी मागत थरूर यांनी सुधारित नकाशा जारी केला.

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी पक्ष कार्यालयात जाऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणून प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी, त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, त्यांनी या निवडणुकीसाठी तयार केलेला जाहीरनामा वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यातील भारताचा नकाशा चुकीचा असल्याने भाजपाने त्यावर टीका केली.

हेही वाचा – राजधानी दिल्लीत रंगला 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, ‘या’ सिनेमा आणि कलाकारांनी स्वीकारला पुरस्कार

- Advertisement -

जाहिरनाम्यातील नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखचा काही भाग नव्हता. पण नंतर सुधारित नकाशा प्रसिद्ध करत शशी थरूर यांनी याबद्दल माफी सुद्धा मागितली. कोणीही जाणूनबुजून अशा गोष्टी करत नाही. कार्यकर्त्यांच्या एका छोट्या टीमने ही चूक केली आहे. आम्ही ती त्वरित सुधारली आहे. यासाठी मी माफी मागतो, असे शशी थरूर यांनी सांगितले.

“माझ्याकडे संघटनाबांधणीचे ठोस व्हिजन”
आपल्याला देशातील नागरिकांची सेवा केली पाहिजे. पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही कसे तत्पर आहोत. ज्यांनी चांगल्या आणि वाईट काळात देखील पक्षाला पुढे नेले आहे, असा कोट्यवधी पक्षकार्यकर्त्यांचे मी प्रतिनिधित्व करतो. पक्षात पुन्हा नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांना आहे. माझ्याकडे संघटनाबांधणीचे ठोस असे व्हिजन आहे, असे शशी थरूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे, प्रताप सरनाईकांच्या वादावर पूर्वेश सरनाईक ट्वीट करत म्हणाले… ‘दो दिल’

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -