सर्वांना एकत्र आणणाऱ्या राजकारणाची गरज, शशी थरुर यांचे प्रतिपादन

shashi-tharoor

नवी दिल्ली : केरळ काँग्रेसमध्ये काही नेते पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांचे खुलेआम समर्थन करीत असून पक्षांतर्गत ‘थरुर गट’ तयार करायला प्रोत्साहन देत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, खुद्द शशी थरुर म्हणाले की, देशात फुटीरतावादी राजकारण सुरू असून अशा वेळी सर्वांना एकत्र आणणाऱ्या राजकारणाची गरज आहे.

थरूर यांनी केरळमधील मलबारला जाऊन यूडीएफचा मित्रपक्ष आययूएमएलच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मी कोणाला घाबरत नाहीत. तसेच, माझ्याबद्दल कोणीही भीती बाळगण्याची गरज नाही. केरळ काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकरची गटबाजी करण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 2016मध्ये काँग्रेसची सत्ता गेली. अशा स्थितीत पक्षांतर्गत नवीन गटबाजीची चर्चा सुरू झाली होती.

थरूर यांची भेट घेतल्यानंतर थंगल म्हणाले की, थरूर यांचे त्यांच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत. आम्हाला सर्व महत्त्वपूर्ण कार्यक्रम, सोहळ्यांना निमंत्रित कले जाते. त्यामुळेच आपण येथे असताना ते मला भेटायला आले, असे ते थरूर यांनी केरळच्या राजकारणात सक्रिय राहावे, अशी त्यांची इच्छा आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, ते आधीच सक्रिय आहेत. ते केरळचे खासदार आहेत, असे ते म्हणाले. आययूएमएलने अलीकडेच चेन्नई, बेंगळुरू आणि मुंबई येथे बंधुभाव वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे थरूर म्हणाले.